Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: IIT मधून इंजिनियरिंग, दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS तेजस्वी राणा आहेत तरी कोण?

Success Story Of IAS Tejasvi Rana: तेजस्वी राणा यांनी दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. त्यांनी कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय हे यश मिळवले आहे.

Siddhi Hande

आयुष्यात प्रत्येकाची काही स्वप्ने असतात. ही स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपण दिवसरात्र मेहनत करतो. आपले ध्येय ठरलेले असेल तर आपण त्या दिशेने वाटचाल करतो. असंच काहीसं तेजस्वी राणा यांनी केली. त्यांनी आपले आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण केले.

आयएएस तेजस्वी राणा या मूळच्या हरियाणाच्या रहिवासी. त्यांनी सुरुवातीला इंजिनियरिंग केले. त्यांनी जेईई परीक्षा पास केली. त्यानंतर त्यांना आयआयटी कानपूरमध्ये अॅडमिशन मिळाले. याच काळात त्यांना सिविल सर्व्हिसमध्ये जाण्याची प्रेरणा मिळाली. त्यांनी आपल्या मनाशी आयएएस होण्याचा निर्धार केला आणि त्यासाठी प्रयत्नदेखील केले.याच प्रयत्नांचे त्यांना यशदेखील मिळाले.

पहिल्या प्रयत्नात अपयश तरीही हार मानली नाही

आयआयटी कानपुरमध्ये सेमिनारमध्ये अनेक आयएएस अधिकाऱ्यांना बोलावले होते. त्यांच्या कामांनी तेजस्वी या प्रेरित झाल्या. त्यानंतर त्यांनी आयएएस (IAS) होण्याचा निर्णय घेतला. २०१५ मध्ये पहिल्या प्रयत्नात त्यांनी प्रीलियम्स परीक्षा पास केली परंतु मेन्समध्ये त्या अपयशी ठरल्या.

दुसऱ्या प्रत्नात मिळवले यश

पहिल्या प्रयत्नात अयशस्वी झाल्यानंतरही त्यांनी हार मानली नाही. त्यांनी २०१६ मध्ये दुसऱ्या प्रयत्नात १२वी रँक मिळवली. त्यांनी अभ्यास करताना ६ वी १२ व्या पुस्तकांमधून अभ्यास केला. त्यांनी खूप अभ्यास केला. लॉकडाउनमध्ये तेजस्वी यांना लेडी सिंघम म्हणून ओळखले गेले. त्यांनी आपल्या कामांमधून अनेकांना प्रेरित केले आहे.

तेजस्वी यांची पतीदेखील आयपीएस (IPS) ऑफिसर आहेत. त्यांचे नाव अभिषेक गुप्ता आहे. या दोघांनी सिविल सर्व्हिस जॉइन करुन देशसेवा करण्याचा निर्णय घेतला. या दोघांनाही पाळीव कुत्र्‍यांची खूप आवड आहे. ते नेहमी सोशल मीडियावर पाळीव कुत्र्‍यांचे फोटो शेअर करत असतात. ते सोशल मीडियावर खूप जास्त सक्रिय असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Gold Rate: सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी, १० तोळ्याच्या दरात ६००० रुपयांनी घसरण, आजचे दर किती?

Maharashtra Live News Update: संगमनेरमध्ये स्कूल बसला अपघात

Mumbai Police News : आलिशान कारमधून आले अन् टपरी चालकाला उचलून नेलं, मुंबईतील २ पोलिसांना बेड्या

Maharashtra Politics: मीरा-भाईंदरमध्ये भाजपला मोठा धक्का, मराठी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्याचा मनसेत प्रवेश|VIDEO

Abhijeet Khandkekar Wife: फेसबुकवर मैत्री नंतर लग्न केलं; कोण आहे अभिजीत खांडकेकरची पत्नी?

SCROLL FOR NEXT