Free Scooty Scheme Saam Tv
बिझनेस

Free Scooty Scheme: आनंदाची बातमी! या सरकारी योजनेत विद्यार्थ्यांना मिळते मोफत स्कूटी, पात्रता काय? वाचा सविस्तर

Rajasthan Kali Bai Bheel Medhavi Chhatra Scooty Yojana: राजस्थान सरकारने विद्यार्थ्यांसाठी खास योजना सुरु केली आहे. या योजनेत हुशार विद्यार्थ्यांना मोफत स्कूटी दिली जाते.

Siddhi Hande

केंद्र सरकारने विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. यातील काही योजनांमध्ये शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाते. दरम्यान, आता १२ वीच्या परीक्षेत चांगले गुण मिळाल्यावर विद्यार्थ्यांना स्कूटी मिळणार आहे. अशी योजना राजस्थान सरकारने सुरु केली आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी ही योजना सुरु केली आहे. जेणेकरुन विद्यार्थी अभ्यास करतील.

राजस्थानमधील या योजनेचं नाव कालीबाई भील मेधावी छात्रा स्कूटी योजना असं आहे. या योजनेत जर १२वीत चांगले गुण मिळाले तर सरकारकडून मोफत स्कूटी दिली जाईल. (Kali Bai Bheel Medhavi Chhatra Scooty Yojana)

योजनेचं उद्दिष्ट (Yojana)

विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळावे. त्यांनी उच्च शिक्षण घ्यावे, या उद्देशाने ही योजना सुरु केली आहे. आई वडिलांनी मुलींना नियमित शाळेत पाठवावे, त्यांना कॉलेज जाण्यासाठी सवलत मिळावी, त्यांचा आत्मविश्वास वाढावा या उद्देशातून ही योजना सुरु केली आहे.

याचसोबत स्कूटीमुळे मिळणाऱ्या सुविधा, ही स्कूटी विद्यार्थ्यांच्या नावावर असते. या योजनेत स्कूटीचा ५ वर्षांचा इन्श्युरन्स मिळतो. एक वर्षाचा फुल इन्श्युरन्स आणि ५ वर्शांचा थर्ड पार्टी इन्श्युरन्स मिळतो.तसेच २ लिटर पेट्रोल आणि एक हेलमेट दिले जाते. तसेच ज्या विद्यार्थ्यांना ही स्कूटी मिळेल ते लोक ५ वर्षांसाठी ही स्कूटी विकू शकत नाही.

योजनेचा लाभ कोणाला मिळणार? (Eligibility)

योजनेचा लाभ मिळवण्यासाठी RBSE बोर्डाच्या विद्यार्थ्यांना कमीत कमी ६५ टक्के गुण मिळवले आहे. सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी७५ टक्के मिळवणे गरजेचे आहे. विद्यार्थी राजस्थानमधील शाळेतून पास असणे गरजेचे आहे. कॉलेज किंवा ग्रॅज्युएशनसाठी अॅडमिशन घेतले असावे. विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे उत्तम २.५ लाखांपेक्षा जास्त नसावे.

अर्ज कसा करावा? (How To Apply)

तुम्हाला सर्वात आधी https://hte.rajasthan.gov,in/ या वेबसाइटवर जायचे आहे.

यानंतर SSO ID वरुन लॉग इन करायचे आहे. यानंतर जन आधारमधून रजिस्ट्रेशन करायचे आहे.

यानंतर ऑनलाइन स्कॉलरशिपवर क्लिक करा आणि काही आवश्यक कागदपत्र अपलोड करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio Recharge Plan: ७५ रुपयांचा जिओचा प्रीपेड प्लॅन! २३ दिवसांची वैधता, अतिरिक्त डेटा मोफत अन् बरंच काही...

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

IPS Anjana Krishna: आई टायपिस्ट, वडील कपडे विकायचे, एकेकाळी डिप्रेशनमध्ये गेल्या, तरी जिद्दीने झाल्या IPS, वाचा अंजना कृष्णा यांचा प्रेरणादायी प्रवास

Saturday Horoscope: आनंदाचा दिवस; अनंत चतुर्दशीच्या दिवशी ६ राशींना होणार धनलाभ, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

Airtel: घरात वाय-फाय समस्या? फक्त ९९ रुपयांमध्ये घरभर हाय स्पीड इंटरनेट

SCROLL FOR NEXT