व्यवसाय कोणताही असो, पण जेव्हा त्याला यश मिळते तेव्हा आनंद गगनात मावत नाही. भारतात असे अनेक व्यवसाय केले जातात ज्यांना खरेतर यश खूप उशिरा मिळते. त्यातील एक शेती.
शेतीचा व्यवसाय म्हटलं की, त्यात मिळणारा नफा हा कितीपर्यंत मिळेल सांगता येत नाही. अशातच काही लोकांनी ही नवीन तंत्रज्ञान आणि आधुनिक पद्धतीचा अवलंब करुन ही गोष्ट चुकीची सिद्ध केली आहे.
इस्त्रोचे माजी प्रकल्प शास्त्रज्ञ आणि सेंद्रिय खजूर शेती करणारे शेतकरी (Farmer) दिवाकर चन्नाप्पा यांचे नावही शेतीतून भरघोस उत्पन्न मिळवणाऱ्या लोकांमध्ये सामील झाले आहे. कर्नाटकात राहाणारे चन्नापा यांनी इस्त्रोची नोकरी (Job) सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी कुटुंबाचा प्रचंड विरोध सहन केला.
महिन्याला लाखो रुपये कमावणारे चन्नाप शेती व्यवसायाच्या निर्णायवर ठाम राहिले. त्यांनी जपानी तत्वज्ञ आणि नैसर्गिक शेतकरी मासानोबू फुकुओका यांच्या 'वन स्ट्रॉ रिव्होल्यूशन' या पुस्तकातून त्यांना प्रेरणा मिळाली. त्याच्या मेहनतीला यश (Success) मिळाले असून ते वर्षाला प्रति एकर ६ लाख रुपये कमावतात.
दिवाकर चन्नापा यांचे कर्नाटकात सगनहल्ली येथे खजुरची शेती आहे. चन्नापा यांनी सामाजिक कार्यात पदव्युत्तर पदवी मिळवून इस्त्रोमध्ये काम करायला सुरुवात केली. तुमकूर विद्यापीठात व्हिजिटिंग फॅकल्टीही होते.
1. वडीलही होते शेतकरी
चन्नापा यांचे वडीलही शेतकरी होते. नाचणी, मका, तूर या पिकांमधून त्यांना चांगले उत्पन्न मिळाले नाही. यामुळेच त्यांनी मुलाला शेती न करण्याचा सल्ला दिला. चांगले शिक्षण घेऊन नोकरी करावी अशी त्यांची इच्छा होती.
2. शेतीची कल्पना कशी सुचली ?
शास्त्रज्ञ म्हणून चन्नापा एकदा पाणलोट प्रकल्पासाठी तामिळनाडूला गेले. त्या ठिकाणी त्यांनी खजुरची शेती पाहिली. तामिळनाडू आणि गावातील वातावरण पाहून त्यांनी खजूर पिकवण्याचा निर्णय घेतला.
3. एका एकरातून ६ लाखांचा नफा
चन्नापा यांच्या शेतात सुरुवातीला केवळ ६५० किलो खजूराचे उत्पादन झाले. त्यावेळी तो ३५० रुपये दराने विकला गेला. आता त्यांच्या शेतीतून सेंद्रिय खजुराचे उत्पादन खूप वाढले आहे. ऑगस्ट २०२३ मध्ये चन्नापाने ४.२ टन किंवा ४२०० किलो खजूराचे उत्पादन करण्यात आले. सध्या ते खजुराच्या लागवडीतून एकरी नफा कमवत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.