FORM 16 Saam Tv
बिझनेस

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

New Income Tax Law: १ एप्रिलपासून मोठा बदल होणार आहे. आता फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130 भरावा लागणार आहे. पगारदार आणि पेन्शनधारकांसाठी प्रक्रिया अधिक सोपी होणार आहे.

Priya More

Summary -

  • फॉर्म 16 ऐवजी फॉर्म 130 लागू होणार

  • 1 एप्रिल 2026 पासून नवीन आयकर नियम लागू

  • फॉर्म 130 मध्ये पगार, TDS आणि कर गणना सविस्तर

  • पगारदार आणि पेन्शनधारकांसाठी प्रक्रिया अधिक सोपी

गिरीश निकम, साम टीव्ही

सगळ्याचं कर्मचाऱ्यांसाठी आता महत्वाची बातमी आहे. इन्कम टॅक्स रिर्टन भरताना गरजेचा असलेला फॉर्म 16 आता बदलणार आहे. त्याच्या ऐवजी तुम्हाला FORM 130 भरावा लागणार आहे. या नवीन फॉर्मची काय वैशिष्ट्ये आहेत पाहूया...

दरमहा वेतन घेणा-या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा बदल होत आहे. कर संबंधित माहिती पुरवणारा फॉर्म 16 आता बदलणार आहे. नवीन आयकर कायदा 1 एप्रिल 2026 पासून लागू होईल. त्यासोबतच फॉर्म 16च्या जागी फॉर्म 130 येईल. या फॉर्ममध्ये कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगाराबद्दल, कर कपातीबद्दल आणि कर जमा करण्याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. त्यामुळे प्रत्येक पगारदार व्यक्तीने फॉर्म 130 काय आहे ? हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

FORM 130 तीन भागांमध्ये विभागलेला असेल. त्यामध्ये तुमचा पगार, कर कपात, सूट आणि एकूण कराबद्दलची संपूर्ण माहिती असेल. भाग 'अ' मध्ये कर्मचारी आणि कंपनीची माहिती असेल. भाग 'ब' मध्ये कर कपातीचा तपशील असेल. भाग 'क' मध्ये संपूर्ण कर गणना दिलेली असेल. हा फॉर्म केवळ पगारदार व्यक्तींनाच नाही, तर काही ज्येष्ठ नागरिकांनाही लागू होईल. त्यात त्यांच्या निवृत्तीवेतन आणि व्याज उत्पन्नाबद्दलची माहिती देखील असेल. तुम्ही एका वर्षात एकापेक्षा जास्त कंपन्यांमध्ये काम केले असेल. तर तुम्हाला वेगवेगळ्या कंपन्यांकडून स्वतंत्र फॉर्म 130 मिळतील. याचा अर्थ प्रत्येक कंपनी स्वतःचा फॉर्म देईल.

पगारदार आणि पेन्शनधारक : ऑटोमेटेड डेटा आणि फॉर्म १३० मुळे फायलिंग सोपे होईल. पेन्शन आणि व्याजाचे उत्पन्न एकाच ठिकाणी आल्यानं ज्येष्ठ नागरिकांची धावपळ थांबेल.

गुंतवणूकदार : सविस्तर माहिती द्यावी लागणार असल्याने गुंतवणूकदारांना कागदपत्रांची अधिक काळजी घ्यावी लागेल.

अचूकता आणि रिफंड : माहिती अचूक असल्यास रिफंड वेगाने मिळेल. मात्र, डेटामध्ये विसंगती आढळल्यास प्रक्रिया रखडू शकते.

फॉर्म 130 तुमच्या आयकर विवरणपत्रासोबत जोडण्याची आवश्यकता नाही. मात्र तो तुमच्या नोंदीसाठी ठेवणे महत्त्वाचे आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे फॉर्म 130 मध्ये चूक झाली असेल, तर कंपनी ती दुरुस्त करू शकते. हे करण्यासाठी, कंपनीला नवीन टीडीएस स्टेटमेंट दाखल करावे लागेल. त्यानंतर एक नवीन दुरुस्त केलेला फॉर्म जारी केला जाईल. फॉर्म 130 जारी करण्याची अंतिम मुदत दरवर्षी 15 जून आहे. पारदर्शकता आणि सुटसुटीतपणा यामुळे पगारदार कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने हा फॉर्म महत्वाचा असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

बीड पुन्हा चर्चेत; पोलीस कर्मचारी २००० लाच घेताना ACBला सापडला

Vastu Tips For Washing Clothes: रात्री कपडे धुवावे की नाही? काय सांगते वास्तू शास्त्र

पुण्यातील रीलस्टार वादात; महिला पत्रकाराच्या विनयभंग प्रकरणी पोलिसांत गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Running vs Walking Benefits: 30 मिनिटे धावणं की 1 तास चालणं? फिट राहण्यासाठी कोणता पर्याय ठरेल बेस्ट

SCROLL FOR NEXT