Flight Rule Change Saam Tv
बिझनेस

Flight Rule Change: फक्त एक हँडबॅग अन् ७ किलो वजन, विमान प्रवासाचे नियम बदलले, वाचा...

Flight Rule Change From 1st January 2025: नवीन वर्षात विमानप्रवासाच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. तुम्ही फक्त एक हँडबॅग किंवा केबिन बॅग फ्लाइटमध्ये घेऊन जाऊ शकतात.

Siddhi Hande

नवीन वर्षात अनेकजण विमानाने परदेशात जाण्याचे प्लान बनवत असतात. नवीन वर्षात काही स्वप्न, इच्छा पूर्ण करण्याचे संकल्प अनेकजण करतात. त्यात परदेशात फिरण्याचा, वर्ल्ड टूर करणे अनेकांचे स्वप्न असते. जर तुम्हीही नवीन वर्षात परदेशात जाण्याचा प्लान करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. नवीन वर्षात विमानप्रवासाच्या नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे.

विमानाने प्रवास करताना तुमच्या बॅगचे वजन चेक केले जाते. जर तुमच्या बॅगचे वजन नियमांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला काही वस्तू काढून ठेवाव्या लागतात. तर याच बॅगेच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. (Flight Rule Change From 1st January 2025)

नवीन वर्षात विमानाप्रवासाच्या नियमांत बदल (Flight Rule Of Handbags)

तुम्ही विमानप्रवास करताना एकच हँडबॅग किंवा केबिन बॅग घेऊन जाऊ शकतात. त्यापेक्षा जास्त बॅग नेली तर तुम्हाला अनेक अडचणी येऊ शकतात.हा नियम देशांतर्गत आणि परदेशातही लागू करण्यात आला आहे. त्यामुळे जर तुम्ही देशातच फिरत असाल तरीही तुम्हाला फक्त एक हँडबॅग किंवा केबिन बॅग घेऊन जाण्याची परवानगी आहे.

विमानात प्रवास करताना प्रिमियम किंवा इकोनॉमी क्लासमधील प्रवासी फक्त एक हँडबॅग किंवा केबिन बॅग घेऊन जाऊ शकतात. या बॅगेचे वजन ७-८ किलो असावे. तर फर्स्ट आणि बिझनेस क्लासच्या लोकांना १० किलोपर्यंतचे वजन घेऊन जाता येईल.

तुमच्या हँडबॅगच्या साइजबाबतच्या नियमांत बदल करण्यात आले आहे. तुमच्या बॅगेची उंची 55 cm असावी. तर लांबी 40 cm असावी. आणि रुंदी 20 cm असावी.

तुम्ही जर २ मे २०२४ च्या आधी फ्लाइट तिकीट बुक केले असेल तर तुम्हाला काही सूट मिळणार आहे. इकोनॉमी क्लासमध्ये तुम्ही ८ किलो वजन घेऊन जाऊ शकतात. प्रिमियम इकोनॉमी क्लासमध्ये बुकिंग असेल तर १० किलो वजनाची हँडबॅग घेऊन जाऊ शकतात. तसेच बिझनेस आणि फर्स्ट क्लासमध्ये १२ किलो वजनाची बॅग घेऊन जाऊन शकतात. जर तुम्ही मे महिन्यानंतर तिकीट बुक केले असेल तर तुम्हाला नवीन नियमांचे पालन करावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT