Mumbai Crime: मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यात चक्क पोलिसाचीच बॅग चोरीला; एटीएम कार्डसह पैसेही लंपास

Police Man Bag Stolen in Azad Maidan: शपथविधी सोहळ्यासाठी तैनात असलेल्या पोलिसाची बॅग चोरीला गेली आहे. तसेच चोरट्यांनी १२.०४ लाख रुपयांच्या वस्तू चोरल्या आहेत.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Oathsaamtv
Published On

मुबंईतील आझाद मैदानावर ५ डिसेंबर रोजी दिमाखात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा पार पडला. मात्र, चोरांच्या सुळसुळाटामुळे सोहळ्याला गालबोट लागले. चार महिला आणि ११ जणांच्या सोन्याच्या चैन चोरट्यांनी लंपास केल्या. पोलिसांच्या हातावर तुरी देत १२ लाखांच्या ऐवजावर चोरट्यांनी हातसफाई केली. शपथविधी सोहळ्याला तब्बल अडीच हजारहून अधिक पोलिस तैनात होते. मात्र इथे पोलीस हवालदाराचीही बॅग लंपास करण्यात आल्याचं समोर आलं आहे.

केंद्र आणि राज्यातील नेत्यांच्या उपस्थित देवेंद्र फडवीस यांनी गुरूवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी सिने कलाकारांचीची मांदियाळी पाहायला मिळाली. हजारो लोकांच्या उपस्थित हा भव्यदिव्य सोहळा पार पडला. मात्र चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत आपले हात साफ केले. कार्यक्रमाची सांगता होताच, गेट क्रमांक २ मधून बाहेर पडत असतानाच चोरट्यांनी डल्ला मारला.

Devendra Fadnavis
Sharad Pawar-Devendra Fadnavis: शरद पवारांची EVM वर शंका, देवेंद्र फडणवीसांनी हिशोबच मांडला!

यात चार महिला आणि ११ जणांच्या सोन्याच्या चैन चोरट्यांनी लंपास केल्या. तसेच अनेकांच्या मोबाईल फोनवर डल्ला मारला. तर काही चोरटे कार्यकर्त्यांचे हजारो रूपयांची रोकड घेऊन पसार झाले. पोलिसांच्या हातावर तुरी देत तब्बल १२ लाखांचा ऐवजावर चोरट्यांनी हातसफाई केली. शपथविधी सोहळ्याला तब्बल ४ हजारहून अधिक पोलिस तैनात होते. पण इथे पोलिसांचीही बॅग चोरट्यांनी सोडली नाही. पोलिस हवालदाराची बॅग ज्यात महत्वाची कागदपत्रे असल्याची माहिती समोर आली आहे.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : बीएमसी निवडणुकीत मनसेसोबत युती? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

द फ्री प्रेस जर्नलच्या माहितीनुसार, समारंभात एका पोलीस हवालदाराची बॅग, त्यात त्याचे एटीएम कार्ड, रोख रक्कम, कपडे आणि इतर वस्तू चोरीला गेल्याची माहिती आहे. महापालिकेच्या गेटवरील सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या व्हीडीओमधून ही बाब समोर आली आहे. मात्र पोलिस हवालदाराची बॅग चोरीला नसून हरवली असलेल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलिसांना पोलिस ठाण्यात सहकार्य होत नसल्याने पोलिसांकडून याबाबत पोलिसांच्या व्हाॅट्स अॅप ग्रुपवर नाराजी व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com