Rule Change update Saam tv
बिझनेस

Rule Change : बँक ते गॅस सिलिंडर...आजपासून बदलणार ५ मोठे नियम, तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

Rule Change update : आज म्हणजे १ मेपासून ५ मोठे बदल होणार आहेत. यामुळे तुमच्या खिशावर मोठा परिणाम होणार आहे.

Vishal Gangurde

नवा महिना आजपासून सुरु होत आहे. दर महिन्याप्रमाणे यंदाही देशात अनेक मोठे बदल होणार आहेत. या नियमाचा थेट सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार आहे. १ मेपासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमती ते एटीएममधून पैसे काढणे महागणार आहे. १ मेपासून एकूण ५ नियमात बदल होणार आहेत.

१ मे रोजी ऑइल मार्केट कंपन्या एलपीजी गॅसच्या किंमतीबाबतीत विचार करण्याची शक्यता आहे. १ मे रोजी एलपीजी सिलिंडरचे नवे दर जाहीर होण्याची शक्यता आहे. मागील महिन्यात १९ किलो ग्रॅमच्या एलपीजी गॅस सिलिंडर किंमतीत कपात करण्यात आली होती. तर सरकारने घरगुती गॅस सिलिंडरचा दर वाढून सर्वसामान्यांना झटका दिला होता. १२ किलो ग्रॅमच्या घरगुती सिलिंडरच्या दरात ५० रुपये वाढवले होते. त्यामुळे आता १ मे रोजी सर्वसामान्यांचं एलपीजी सिलिंडरच्या किंमतीवर लक्ष असणार आहे.

एटीएफ-सीएनजी-पीएनजीचे दर

एलपीजी सिलिंडरसहित एअर टर्बाइन फ्यूलच्या दरात बदल केले जाणार आहेत. एटीएफच्या किंमतीत घट किंवा वाढ केल्यास त्याचा परिणाम हवाई यात्रा करण्याऱ्या प्रवाशांचा खिशावर होणार आहे. १ मे रोजी सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतीत बदल देखील पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

एटीएमच्या नियमात बदल

एटीएम मशीनमधून पैसे काढणे देखील महागणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या प्रस्तावावर फी वाढवण्यास मान्यता दिली आहे. १ मेपसासून ग्राहक होम बँकेच्या ऐवजी दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढणे महागणार आहे. एका ट्रांजेक्शनवर १७ रुपयांऐवजी १९ रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तर दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून शिल्लक रक्कम तपासण्यावर ६ रुपयांऐवजी ७ रुपये आकारले जाणार आहे. अनेक बँकाच्या वेबसाईटवर फ्री-लिमिटनंतर ट्रांजेक्शन्सवर शुल्क आकारण्याविषयी माहिती देणे सुरु करुण्यात आलं आहे. यात एचडीएफसी, पीएनबी, इंडसइंड बँकेचा समावेश आहे.

रेल्वे तिकीट बुकिंगचा नियम

१ मेपासून होणारा चौथा बदल म्हणजे भारतीय रेल्वेशी संबंधित आहे. रेल्वे तिकीट बुकिंगच्या नियमात बदल केले जाणार आहेत. वेटिंग तिकिट फक्त जनरल कोचसाठी असणार आहे. तर वेटिंग तिकिट घेऊन स्लीपर कोचमधून प्रवास करता येणार नाही. आगाऊ रिजर्वेशन अवधी १२० दिवसांनी घटवून ६० दिवस करण्यात आला आहे.

आरआरबी योजना होणार लागू

मे महिन्यात आणखी एक मोठा बदल होणार आहे. १ मेपासून देशातील ११ राज्यात 'one state-one RRB' योजना लागू होणार आहे. राज्यातील सर्व ग्रामीण बँकांना एकत्र जोडून एक मोठी बँक तयार करण्यात येणार आहे. यात सर्व बँकिंग सेवा मिळणार आहेत. ग्राहकांना आधीपेक्षा अधिक सेवा मिळणार आहेत. हा बदल उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेशसहित इतर राज्यात लागू होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT