Financial Year End Saam Tv
बिझनेस

Financial Year End: कामाची बातमी! १५ दिवसांत करा 'ही' ७ कामे; अन्यथा होईल आर्थिक नुकसान

Do These Work Before 31st March: मार्च महिना अर्धा संपला आहे. आर्थिक वर्ष संपणार आहे. त्यामुळे आर्थिक वर्ष संपण्याआधी तुम्हाला महत्त्वाची कामे पूर्ण करायची आहेत. अन्यथा तुम्हाला पुढच्या वर्षी अनेक अडचणी येऊ शकतात.

Siddhi Hande

३१ मार्चपर्यंत ही कामे कराच

टॅक्सपासून ते योजनेच्या गुंतवणूकीची सर्व कामे करणे गरजेचे

आर्थिक वर्ष संपण्याआधी ही ७ कामे करा

मार्च महिना हा खूप महत्त्वाचा महिना असतो. आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असतो. त्यामुळे या आर्थिक वर्षातील पैशांसंबंधित सर्व कामे तुम्हाला आर्थिक वर्ष संपण्याआधी करायची असतात. त्यामुळे तुम्हाला ३१ मार्चपूर्वी हे काम करायचे आहे. जर तुम्ही काही महत्त्वाची कामे केली नाही तर पुढच्या आर्थिक वर्षात तुम्हाला अडचणी येऊ शकतात.

टॅक्स सेव्हिंग (Tax Saving)

सध्या देशात दोन टॅक्स प्रणाली आहेत. एक जुनी कर प्रणाली आणि नवीन करप्रणाली. जर एखाद्या व्यक्तीने HUF जुनी आयकर प्रणाली निवडली तर त्यांना 80C, 80D, 80TTB, 80E, 80G अंतर्गत डिडक्शनचा फायदा मिळतो. त्यामुळे जुनी कर प्रणाली स्विकारणाऱ्यांना टॅक्स सेव्हिंग करण्यासाठी शेवटची तारीख ३१ मार्च २०२६ आहे.

पीपीएफ आणि सुकन्या समृद्धी योजना

पीपीएफ आणि सुकन्या समृद्धी योजनेत दरवर्षी एक ठरावीक रक्कम गुंतवणे आवश्यक आहे. त्यामुळे जर तुम्ही अजूनही पैसे गुंतवले नसतील तर लगेच हे काम करा. ३१ मार्चपूर्वी तुम्हाला पैसे गुंतवायचे आहेत. पीपीएफमध्ये किमान २५० रुपये गुंतवायचे आहे तर सुकन्या समृद्धी योजनेत २५० रुपये गुंतवायचे आहेत.

कर्मचाऱ्यांना गुंतवणूकीचा पूरावा जमा करायचा असतो

ज्या कर्मचाऱ्यांनी टॅक्स वाचवण्यासाठी गुंतवणूक केली आहे त्यांनी याबाबत माहिती द्यायची आहे. त्यांना पेरोल कट ऑफआधी याबाबत कागदपत्रे जमा करायची आहेत.

ITR-U फाइल करणे

२०२१-२२ मध्ये ज्यांनी आयटीआर फाइल केले नाही त्यांनी अपडेटेड आयटीआर फाइल करायचा आहे. यासाठी ३१ मार्चपर्यंतची मुदत आहे. त्यामुळे ज्या करदात्यांना आयटीआर फाइल करण्यासाठी उशिर झाला आहे त्यांनी लवकरात लवकर हे काम करायचे आहे.

होम लोन सर्टिफिकेट

तुम्ही जर होम लोन घेतले असेल तर तुम्हाला व्याजाचे सर्टिफिकेट डाउनलोड करायचे आहे. तुम्ही आयकर कायदा 1961 च्या कलम 24(b) अंतर्गत २ लाखांपर्यंत डिडक्शनसाठी दावा करु शकतात. तुम्हाला १.५ लाखांपर्यंत सूट मिळेल.

फॉर्म 12B

जर तुम्ही कर्मचारी आहात आणि २०२५-२६ मध्ये नोकरी बदलली आहे तर तुम्हाला जुन्या कंपनीचा इन्कम फॉर्म सध्याच्या कंपनीत जमा करायचा आहे.

परदेशातील गुंतवणूकीचे आयकर स्टेटमेंट अपलोड करणे

जर तुम्ही विदेशात गुंतवणूक केली असेल तर त्याचे स्टेटमेंट अपलोड करायचे आहे. यासाठी ३१ मार्चपर्यंतची शेवटची तारीख आहे. फॉरेन टॅक्स क्रेडिटसाठी दावा करण्यासाठी हे स्टेटमेंट गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कीर्तनकाराचं काळं कृत्य, पक्कडीने चटके देऊन अल्पवयीन मुलीवर बळजबरीने अत्याचार, अहिल्यानगर हादरले

Maharashtra Live News Update : रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षपदाची आज निवड

Viral Video: जखमी व्यक्तीच्या डोक्यावर टाक्यांऐवजी स्टेप्लर पिन; व्हायरल व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ

Gas after drinking milk: दूध प्यायल्यानंतर पोटात गॅस किंवा दुखणं होतं? जाणून घ्या यामागचं खरं कारण

Gudi Padwa 2026: गुढीपाडव्याला पारंपारिक पद्धतीने गुढी कशी तयार करावी? गुढी उभारण्याची पद्धत जाणून घ्या

SCROLL FOR NEXT