FASTag Saam Tv
बिझनेस

वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी! १ फेब्रुवारीपासून FASTag च्या नियमात बदल; तुम्हाला माहित असायलाच हवा

FASTag Toll Tax Rule Change From 1st February: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. १ फेब्रुवारीपासून टोलच्या नियमात महत्त्वाचे बदल केले आहे. आता तुम्हाला वाहनासाठी Know Your Vehicle करणे गरजेचे नाही.

Siddhi Hande

वाहनधारकांच्या कामाची बातमी

फास्टॅग टोलबाबत महत्त्वाचा निर्णय

आता वाहनांना Know Your Vehicle (KYV) व्हेरिफिकेशन करणे गरजेचे नाही

वाहनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता फास्टॅग सिस्टीम अजून सोपी करण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडियाने टोलबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता १ फेब्रुवारी २०२६ पासून कार, जीप किंवा व्हॅनसाठी जारी केलेल्या फास्टॅगसाठी Know Your Vehicle (KYV) व्हेरिफिकेशन प्रोसेस लागू केलेली जाणार नाही.

Know Your Vehicle करणे गरजेचे नाही

फास्टॅग जारी केल्यानंतर वापरताना अनेकदा उशिर होतो. अनेकदा कागदपत्र पडताळणीसाठी खूप वेळ थांबावे लागतात. यासाठी Know Your Vehicle (KYV) करणे अनिवार्य होते.यासाठी तुम्हाला नेहमी आरसी अपलोड करावी लागयाची. फोटो अपलोड करावी लागायची. दरम्यान, जर Know Your Vehicle करताना उशिर झाला तर अनेक अडचणी येतात. यामुळे आता ही प्रोसेस करणे बंद केले आहे.

नवीन नियमांनुसार NHAI ने व्हेरिफिकेशनचे काम बँकांकडे सोपवले आहे. आता फास्टॅग जारी करणाऱ्या बँकांनाच वाहनाशी संबंधित सर्व माहिती तपासून बघायची आहे. वाहनाच्या डेटाबेसद्वारे हे व्हेरिफिकेशन केले जाईल. त्यामुळे तुम्हाला फास्टॅग अॅक्टिव्ह करण्यासाठी सारखं व्हेरिफिकेशन करण्याची गरज नाही.

नियमात बदल का केला?

Know Your Vehicle (KYV) FASTag द्वारे व्हेरिफिकेशन केले जायचे. यावरुन फास्टॅग बरोबर आहे ना, चुकीचा किंवा ड्युप्लिकेट फास्टॅग तर वापरत नाही ना, हे चेक करण्यासाठी ही प्रोसेस असायची. परंतु अनेकदा तांत्रिक अडचणींमळे या प्रोसेसला वेळ लागयचा. त्यामुळे वाहनधाकांना अडचणी यायच्या.यामुळेच आता KYV न करण्याचा निर्णय घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update :मुंबईचे डबेवाले आजपासून सहा दिवस सुटीवर

लिव्ह-इन रिलेशनशिपमधील जोडप्यांना नवरा-बायको समजलं जाणार? जनगणनेच्या नव्या नियमामुळे चर्चांना उधाण

Heart attack: हार्ट अटॅकपूर्वी दिसणाऱ्या या ५ लक्षणांकडे महिला करतात हमखास दुर्लक्ष; शरीरात होणारे बदल ओळखा

Gold Rate Today: खुशखबर! सराफा बाजार उघडताच सोनं झालं स्वस्त; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Phone Charging Tips : चार्जर नाही, तर काय झाले; 'या' स्मार्ट ट्रिक्स वापरून मिनिटांत मोबाईल फोनची बॅटरी होईल फुल

SCROLL FOR NEXT