FASTag Pass Saam Tv
बिझनेस

FASTag Pass: फास्टॅग पासच्या किंमती वाढल्या; १ एप्रिलपासून लागू; किती पैसे मोजावे लागणार?

FASTag Annual Pass Price Hike: फास्टॅग टोल पासच्या किंमतीत वाढ झाली आहे. सध्या फास्टॅग टोल पास ३००० रुपयांना मिळत आहे. आता या पासच्या किंमती वाढल्या आहेत. १ एप्रिलपासून नवीन दर लागू होणार आहेत.

Siddhi Hande

वार्षिक टोल पासची किंमत वाढली

NHAI ने जारी केले निर्देश

१ एप्रिलपासून टोल पासच्या नवीन किंमती जाहीर

राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राष्ट्रीय महामार्गावरुन वारंवार प्रवास करत असेल तर तुम्हाला टोल पास उपयोगी ठरतो. मात्र, आता या पासच्या किंमती वाढणार आहे. १ एप्रिलपासून तुम्हाला वार्षिक फास्टॅग पाससाठी जास्त रक्कम मोजावी लागणार आहे. हा प्रवास महागणार आहे. नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडियाने याबाबत निर्णय घेतला आहे. या टोल किंमतीत वाढ केली आहे.

टोल पासच्या वाढलेल्या किंमती

भारतीय राष्ट्रीय महामार्गाच्या वार्षिक टोल पासची किंमत ३००० रुपयांवरुन ३०७५ रुपये करण्यात आली आहे. हे दर आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी आहेत. हा पास फक्त खासगी वाहनांसाठी असतो. १ वर्षासाठी हा पास वापरु शकतात. १ एप्रिल २०२६ पासून पासच्या नवीन किंमती लागू होणार आहे.

१ वर्षासाठी पास

नवीन नियमानुसार, हा वार्षिक पास आता ३०७५ रुपयांचा असणार आहे. हा पास एक वर्षासाठी वापरता येणार आहे. याचसोबत २०० वेळा टोल क्रॉसिंग असणार आहे. जर तुम्ही २०० वेळा टोल क्रॉस केला तर या पासची वैधता संपणार आहे. जर असं केलं नसेल तर १ वर्षात ही मुदत संपणार आहे.

NHAI ने दिले संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सर्व टोल प्लाझा आणि अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. टोलवरुन जाणाऱ्या प्रवाशांना ही माहिती देण्यास सांगितले आहे. १ एप्रिलपासून हे नवीन नियम लागू होणार आहेत. पुढच्या वर्षभरासाठी वार्षिक टोल पासची किंमत ३०७५ रुपये असणार आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, टोल संबंधित दरांचे दरवर्षी पुनरावलोकन होणार आहे. यामध्ये सुधारणा केली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT