Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! दोनदा अपयश, हार मानली नाही; कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय तिसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IPS आशना चौधरी यांचा प्रवास

Success Story Of IPS Aashna Chaudhary: आयपीएस आशना चौधरी यांनी तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. त्यांनी कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय हे यश मिळवलं आहे.

Siddhi Hande

यूपीएससी परीक्षा देऊन सरकारी अधिकारी होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. स्पर्धा परीक्षा देण्यासाठी दिवसरात्र अभ्यास करावा लागतो. जर तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करायची असतील तर मेहनत हा एकमेव मार्ग आहे. अशीच मेहनत आशना चौधरी यांनी केली आणि यूपीएससी परीक्षा क्रॅक केली.

आशना चौधरी यांचा प्रवास हा प्रेरणादायी आहे. लहान गावात जन्मलेल्या आशना यांनी खूप मोठे नावलौकिक कमावले आहे. त्यांचे सोशल मीडियावरदेखील लाखो फॉलोवर्स आहेत.(Success Story)

आशना यांचे वडील डॉ. अजीत सिंह हे सरकारी कॉलेजमध्ये प्रोफेसर होते. त्यांची आई इंदु सिंह या गृहिणी आहेत. आशना यांचा जन्म सामान्य घरात झाला. परंतु त्यांची स्वप्ने खूप मोठी होती. त्यांनी सेंट जेवियर स्कूल, सेंट मेरी स्कूल आणि दिल्ली पब्लिक स्कूल अशा विविध शाळांमधून शिक्षण पूर्ण केले.

शालेय शिक्षण झाल्यानंतर आशना या दिल्ली येथील श्री राम कॉलेज फॉर वुमन येथे गेल्या. त्यांनी इंग्लीश लिटरेचरमध्ये पदवी प्राप्त केली. त्यांनी साउथ एशियन युनिव्हर्सिटीमधून इंटरनॅशनल रिलेशनमध्ये मास्टर्स डिग्री प्राप्त केली. याच काळात त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी केली. (Success Story Of AAshna Chaudhary)

२०१९ मध्ये आशना यांचे ग्रॅज्युएशन पूर्ण झाले. त्यांनी कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. त्यांनी २०२० मध्ये पहिल्यांदा परीक्षा दिली. यावेळी त्यांना प्रिलियम्स परीक्षादेखील क्लिअर करता आली नव्हती. दुसऱ्या प्रयत्नातही त्यांना यश मिळाले नाही. मात्र, त्यांनी पुन्हा परीक्षा दिली.त्यांनी तिसऱ्या प्रयत्नात परीक्षा क्रॅक केली.

यूपीएससी परीक्षेत त्यांना ११६ रँक मिळाली. त्यांना आयएएस होत आले असते परंतु त्यांनी आयपीए, होण्याचा निर्णय घेतला.त्या सोशल मीडियावर खूप जास्त प्रसिद्ध आहेत. त्यांचे लाखो फॉलोवर्स आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dadpe Pohe Recipe: सकाळच्या नाश्त्याला घरच्या घरी झटपट बनवा स्वादिष्ट दडपे पोहे; वाचा सोपी रेसिपी

Heart Attack Symptoms : सकाळी उठताच दिसतात हॉर्ट अॅटकची ही ६ लक्षणं, दुर्लक्ष करणं पडेल महागात

Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचे तांडव! मुंबई-ठाण्यासह ४ जिल्ह्यांना 'रेड अलर्ट', ९ जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार

Maharashtra News Live Update: मुंबई, ठाणे, पालघरला पावसाचा रेड अलर्ट

Sunday Horoscope: दिवस धावपळीचा राहील; ५ राशींच्या व्यक्तींनी रागावर ठेवा नियंत्रण; वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT