Fact Check Bank Account Balance Rule saam tv
बिझनेस

Fact Check: बँक खात्यात 10 हजार रूपये ठेवणं बंधनकारक? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Fact Check Bank Account Balance Rule: तुमचं बँकेत अकाऊंट आहे का? बँकेत अकाऊंट असेल तर आता तुम्हाला खात्यात 10 हजार रुपये शिल्लक ठेवावे लागतील. नाहीतर तुम्हाला बँक दंड ठोठावणार. होय, असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय. त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.

Bharat Jadhav

बँकेत कोट्यवधी लोकांची खाती आहे. एका एका व्यक्तीची बँकेत एकापेक्षा जास्त खाती आहेत. त्यामुळे या मेसेजची सत्यता जाणून घेणं गरजचं आहे. कारण, आमच्या प्रेक्षकांचं नुकसान होऊ नये यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमने पडताळणी सुरू केली. त्याआधी हा मेसेज काय व्हायरल होतोय पाहुयात.

व्हायरल मेसेज

खातेदारांनी त्यांच्या बँकेच्या बचत खात्यांमध्ये दरमहा किमान 10 हजार रुपये एवढी रक्कम शिल्लक ठेवावी. नाहीतर त्यांना बँकेकडून दंडाला सामोरे जावे लागेल. ही रक्कम शिल्लक रकमेच्या 6 टक्के किंवा कमाल 500 रुपये एवढी असेल.

हा मेसेज व्हायरल होतोय. बँकेत सगळेच पैसे ठेवतात. पण, सगळ्यांनाच 10 हजार रुपये शिल्लक ठेवणं शक्य नसतं. त्यामुळे या मेसेजमध्ये तथ्य आहे का? हा निर्णय सगळ्याच बँकांनी घेतलाय का? अचानक बँकांनी असा निर्णय का घेतला. या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. याबाबत रिझर्व्ह बँकेकडून माहिती मिळवली. त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात.

व्हायरल सत्य/ साम इन्व्हिस्टिगेशन

हा निर्णय सगळ्याच बँकांसाठी लागू नाही

फक्त डीबीएस बँकेने हा निर्णय घेतलाय

डीबीएसच्या ग्राहकांना 1 ऑगस्टपासून खात्यात 10 हजार ठेवावे लागतील

10 हजार न ठेवल्यास शिल्लक रकमेच्या 6% दंड आकारणार

डीबीएस बँकेने बचत खात्यांसाठी सरासरी शिल्लक रकमेची किमान मर्यादा ही 10 हजार रुपये एवढी केलीय. डीबीएस बँकेने आपल्या ग्राहकांना एसएमएसच्या माध्यमातूनही ही माहिती दिली आहे...मात्र, हा निर्णय सगळ्यांसाठीच लागू असल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय...फक्त डीबीएस बँकेत खातं असल्यास 10 हजार रुपये ठेवावे लागतील

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील अजित पवारांच्या उपस्थितीत कात्रज दूध डेअरी मध्ये सर्वसाधारण सभेचे आयोजन

Navratri Festival : नवरात्रीची अनोखी परंपरा; कडक उपवासात ९ दिवस बसायचं नाही, झोपायच पण तेही उभं राहून

IND vs SL: श्रीलंकेविरूद्ध टीम इंडियामध्ये ३ बदलांची शक्यता; फायनलपूर्वी 'या' खेळाडूंना मिळणार संधी, पाहा कशी असेल प्लेईंग 11

Devoleena Bhattacharjee: गोपी बहूचे बेबी बंप फोटो व्हायरल; चाहत्यांना देणार पुन्हा गोड बातमी?

Sanjay Raut : PM केअर फंडाच्या मदतीने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, ठाकरेंच्या खासदाराची मागणी | VIDEO

SCROLL FOR NEXT