berojgari bhatta yojana fact check x
बिझनेस

Fact Check : केंद्र सरकारची बेरोजगारी भत्ता योजना! तरुणांना दरमहा २,५०० रुपये मिळणार, काय आहे सत्य?

PIB Fact Check News : बेरोजगारी भत्ता योजनेच्या अंतर्गत दर महिन्याला नोकरी नसलेल्या तरुणांना अडीच हजार रुपये मिळणार असा व्हिडीओ व्हायरल होत आहे. पीआयबी फॅक्टचेकने याची सत्यता तपासली आहे.

Yash Shirke

  • केंद्र सरकारच्या बेरोजगारी भत्ता योजनेत दर महिन्याला २,५०० रुपये मिळणार, असा व्हिडीओ खोटा आहे.

  • अशी कोणतीही अधिकृत योजना अस्तित्वात नाही, असे PIB Fact Check ने स्पष्ट केले आहे.

  • नागरिकांनी संशयास्पद व्हिडीओ, मेसेज किंवा फोटो PIBFact Check कडे पाठवून सत्य माहिती मिळवावी.

Fact Check News : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. व्हिडीओंचा वापर करुन लोकांची दिशाभूल करत असतात. असाच दिशाभूल करणारा व्हिडीओ व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारच्या बेरोजगारी भत्ता योजना अंतर्गत बेरोजगार तरुणांना दर महिन्याला २,५०० रुपये मिळतील असा दावा या व्हिडीओत करण्यात आला आहे. एका युट्यूब चॅनलवर हा व्हिडीओ प्रसारित करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या अधिकृत संस्थांनी हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट केले आहे.

PIB Fact Check ने व्हायरल व्हिडीओतील दाव्याची पडताळणी केली आहे. अशी कोणतीही अधिकृत योजना अस्तित्त्वात नाही. केंद्र सरकारशी संबंधित असल्याचा दावा करणारे कोणतेही फोटो, व्हिडीओ किंवा मेसेज फसवणूकीसाठी वापरले जात आहेत. या संदर्भात पीआयबी फॅक्ट चेकने नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. अशा दाव्यांवर विश्वास न ठेवण्याचे सरकारने नागरिकांना आवाहन केले आहे.

खोट्या बातम्या, बनावट व्हिडीओ, खोटे व्हिडीओ यांपासून सावध राहण्यासाठी आणि नागरिकांना अधिकृत माहिती मिळावी यासाठी केंद्र सरकारने काही सोयीस्कर माध्यमे उपलब्ध करुन दिली आहेत. जर कोणालाही अशा प्रकारचे संशयास्पद मेसेज, व्हिडीओ किंवा फोटो मिळाले, जे सरकारशी संबंधित असल्याचा दावा करतात. अशा गोष्टींची माहिती पीआयबी फॅक्ट चेककडे पाठवू शकता.

PIB Fact Check शी संपर्क साधण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपवर +91 8799711259 किंवा ईमेल factcheck@pib.gov.in यांचा वापर करता येईल. फॅक्ट चेकचे मुख्य उद्दिष्ट खोटी, चुकीची आणि फसवणूक करणाऱ्या माहितीपासून नागरिकांचा बचाव करणे हे आहे. अनेकदा सोशल मीडियावर अशा खोट्या दाव्यांचा प्रचार होतो, ज्यामुळे लोकांना चुकीची माहिती पसरते. त्यामुळे कोणत्याही योजनेबाबत किंवा सरकारी निर्णयाबाबत मिळालेल्या माहितीची त्वरित पडताळणी करणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dombivli : मामाच्या घरी आलेल्या ४ वर्षीय चिमुरडीला चावला साप, उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू

India Pakistan Asia Cup Final: पाकिस्तानचा मंत्री ट्रॉफी घेऊन पळाला, भारताच्या विजयानंतर नेमकं काय घडलं?

Ahilyanagar Clash: अहिल्यानगर का पेटलं? धार्मिक तणाव का निर्माण झाला?

पूर ओसरला, पण शेतकऱ्यांच्या ओल्या स्वप्नांचा चिखल कायम

Relationship Tips: नात्यात 'या' चुका वारंवार करताय? तर नातं जास्त काळ टिकणार नाही

SCROLL FOR NEXT