कामाला जाणारी प्रत्येक व्यक्ती तिच्या पगारातला काही भाग पीएफमध्ये जमा करत असते. त्याचा फायदा भविष्यात पैशांची अडचण येते तेव्हा होतो. पण बऱ्याचदा कर्मचाऱ्यांना त्यांचा पगार किती जमा झालाय? आणि पगार दर महिन्याला जमा होतोय का, हेच माहित नसतं. आधी पीएफ तपासायची प्रोसेस खूप मोठी आणि किचकट होती. आता तुम्ही काहीच मिनिटात WhatsApp च्या मदतीने तुमच्या पीएफची माहिती मिळवू शकता.
आता पीएफची माहिती मिळवण्यासाठी सतत वेबसाइट तपासण्याची गरज नाही. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) त्यांच्या सदस्यांपर्यंत विविध योजनांची आणि निर्णयांची माहिती पोहोचवण्यासाठी WhatsApp चॅनेलचाही वापर करत आहे. यामध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF), कर्मचारी पेन्शन योजना (EPS) कर्मचारी जमा संलग्न विमा योजना (EDLI) यांच्याशी संबंधित माहिती मिळते करते. तसेच सरकारी निर्णय, विविध योजनांमधला बदल, महत्त्वाच्या मुदती आणि सदस्यांसाठीच्या उपक्रमांचा समावेश असतो.
तसेच कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या शिबिरांची माहितीही इथे मिळू शकते. EPFO आपल्या चॅनेलवर मार्गदर्शनवरील व्हिडिओ आणि ट्युटोरियल्सच्या लिंक्ससुद्धा शेअर करते. त्यामुळे पीएफ अॅडव्हान्स काढण्याची प्रोसेस आणि रोजगाराशी संबंधित योजनांमधल्या योगदानासारख्या विषयांची माहिती समजून घेणं सोपं होतं.
EPFO च्या अधिकृत WhatsApp चॅनेलला जोडण्यासाठी सर्वप्रथम EPFO च्या अधिकृत WhatsApp चॅनेलच्या लिंकवर क्लिक करा. WhatsApp उघडल्यानंतर संबंधित चॅनेल दिसेल. चॅनेलवर Follow या पर्यायावर क्लिक करा. मग तुम्हाला नवीन अपडेट्स WhatsApp च्या Updates विभागात पाहता येतील.
महत्त्वाची बाब म्हणजे, EPFO चे WhatsApp चॅनेल हे फक्त माहिती मिळवण्याचं माध्यम आहे. या चॅनेलवरून पीएफ बॅलन्स तपासणं, पैसे काढणं, क्लेम दाखल करणं किंवा पेन्शनसंबंधी व्यवहार पूर्ण करणं शक्य नाही. अशा कामांसाठी EPFO चे अधिकृत पोर्टल किंवा UMANG अॅप वापरता येईल. गरजेनुसार संबंधित प्रादेशिक EPFO कार्यालयाशीही संपर्क साधता येतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.