EPFO Saam Tv
बिझनेस

EPFO कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! PF वरील व्याजदर जमा होण्यास सुरुवात; असा चेक करा बॅलेंस

How to Check PF Intrest Rate: ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता ईपीएफओ खातेधारकांच्या अकाउंटमध्ये व्याजदर जमा होण्यास सुरुवात झाले आहे. तुमच्या खात्यात व्याजदर जमा झाले की नाही अशा पद्धतीने करा चेक.

Siddhi Hande

कर्मचारी भविष्या निर्वाह निधी म्हणजेच ईपीएफओच्या (EPFO) सदस्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी पीएफ अकाउंटमध्ये व्याजदर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, अजूनपर्यंत EPFO कडून कोणत्याही प्रकारची सूचना किंवा एसएमएस जारी करण्यात आलेला नाही. परंतु अनेक खातेधारकांच्या खात्यात पीएफ अकाउंटमध्ये पैसे जमा झाल्याचे दिसत आहे.

सरकारने काही दिवसांपूर्वीच EPF अकाउंटसाठी ८.२५ टक्के व्याजदर निश्चित केले होते. हे व्याजदर फेब्रुवारी २०२५ पासून लागू होणार आहे. सरकारने या प्रस्तावाला मंजुरीदेखील दिली आहे. त्यानंतर आता ७ कोटींपेक्षा जास्त खातेधारकांना फायदा होणार आहे. या खातेधारकांच्या खात्यात वार्षिक व्याज जमा होणार आहे

PF अकाउंटमध्ये व्याजदर जमा झाले की नाही असं करा चेक (How to check epfo interest rate recieve or not)

ईपीएफ खातेधारकांच्या खात्यात व्याजदर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तुमच्याही खात्यात पैसे जमा झाले की नाही हे तुम्ही ऑनलाइन पद्धतीने चेक करु शकतात. EPFO च्या पोर्टलवर जाऊन तुम्हाला ही सर्व प्रक्रिया करता येणार आहे.

  • सर्वात आधी तुम्हाला https://passbook.epfindia.gov.in वर जायचे आहे.

  • त्यानंतर तुम्हाला तुमचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकायचा आहे.

  • यानंतर रजिस्टर मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी टाका.

  • यानंतर लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला Member ID दिसणार आहे.

  • यानंतर पासबुक टॅबवर क्लिक करा आणि संबंधित Member ID वर क्लिक करा. यानंतर तुम्हाला पासबुक दिसणार आहे.

  • पासबुकमध्ये कर्मचारी आणि नियोक्ता यांनी जमा केलेले पैसे वेगवेगळ्या एन्ट्री दिसतात. तुम्हाला जमा झालेल्या रुपयांच्या आधारे व्याजदर जमा झाले की नाही हे समजेल.

व्याजदर दिसत नसेल तर काय करावे?

ईपीएफओ पोर्टलवर व्याजदर अपडेट होण्यासाठी काही वेळ लागू शकतो. जर पासबुकमध्ये व्याजदर दिसत नाही तर काही वेळ वाट पाहा. जर काही दिवसानंतरही तुमच्या खात्यात व्याज जमा झाले नाही तर EPFO च्या कार्यालयात किंवा ऑनलाइन ग्रेव्हिएन्स पोर्टलवर जाऊन तक्रार करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

OBC Protest: मोठी बातमी! सरकारच्या जीआरविरोधात न्यायालयात जाणार, छगन भुजबळांसह ओबीसी नेत्यांमध्ये चर्चा सुरू

Actress : ...मारा, तिचे कपडे काढा, अफेयरच्या अफवांवरुन छळ, मराठी अभिनेत्रीने सांगितला भयानक अनुभव

Manoj jarange patil protest Live: - सरकारच्या जीआर विरोधात ओबीसी नेते न्यायालयात धाव घेणार

Gunratan Sadavarte: मोठी बातमी! सरकारच्या निर्णयावर आक्षेप, गुणरत्न सदावर्ते कोर्टात जाणार

Manoj Jarange: रक्ताने रंगवलेलं पिंपळपान: मनोज जरांगे आणि छत्रपती शिवाजी महाराज एकाच चित्रात|VIDEO

SCROLL FOR NEXT