EPFO Saam Tv
बिझनेस

EPFO: कंपनी खरंच तुमच्या PF अकाउंटमध्ये पैसे जमा करते का? एक मिस्ड कॉल द्या अन् करा चेक

How To Check PF Balance: प्रत्येक कर्मचाऱ्याचे पीएफ अकाउंट असते. पीएफ अकाउंटमध्ये दर महिन्याला ठरावीक रक्कम जमा केली जाते. तुमच्या खात्यात खरंच रक्कम जमा होते की नाही तुम्ही मिस्ड कॉलद्वारे चेक करु शकतात.

Siddhi Hande

कोणत्याही क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचे पीएफ अकउंट हे असते. पीएफ अकाउंटमध्ये दर महिन्याला आपल्या पगारातील काही रक्कम जमा केली जाते. पीएफ अकाउंटमधील ही रक्कम एक गुंतवणूक असते. पीएफ अकाउंट हे ईपीएफओद्वारे चालवले जाते. पीएफ अकाउंटमधील जमा रक्कमेवर सरकारकडून व्याजदर दिले जाते. दरम्यान, तुमच्या पीएफमधील जमा रक्कमेवर व्याजदर दिले जाते की नाही हे चेक कसं करायचं जाणून घ्या.

ईपीएफ बॅलेंस कसा चेक करावा? (How To Check PF Balance)

तुम्ही ईपीएफओच्या वेबसाइटवरुन, अॅपवरुन किंवा मेसेजद्वारे पीएफ बॅलेंस चेक करु शकतात. यासाठी तुम्हाला काही स्टेप फॉलो कराव्या लागतील.

अॅपवरुन चेक करा

तुम्ही फोनमध्ये UMANG अॅप डाउनलोड करा.

यानंतर युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.

यानंतर तुम्हाला View Passbook हा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला तिथेल बॅलेंस दिसेल. यामध्ये तुमच्या डिपॉझिटची तारीख आणि रक्कम सर्वकाही दिसेल.

वेबसाइटवरुन करा बॅलेंस चेक

तुम्ही ईपीएफओच्या वेबसाइटवरुनदेखील पीएफ बॅलेंस चेक करु शकतात.

तुम्हाला सर्वात आधी ईपीएफओच्या वेबसाइटवर जावे लागेल.

यानंतर Employees सेक्शनवर क्लिक करायचे आहे.

यानंतर लॉग इन करुन मेंबर पासबुकवर जायचे आहे.

यानंतर पीएफची माहिती मिळवण्यासाठी यूएएन नंबर आणि पासवर्ड टाकावा लागेल.

यानंतर तुम्हाला स्क्रिनवर पीएफ पासबुक दिसणार आहे.

मिस्ड कॉलद्वारे करु शकता चेक

तुम्ही मिस्ड कॉलद्वारेदेखील तुमच्या पीएफ अकाउंटमध्ये किती पैसे आहेत ते चेक करु शकतात. यावरुन तुम्हाला पीएफवर व्याजदर जमा होते की नाही हे समजते.

सर्वात आधी तुम्हाला UAN रजिस्टर मोबाईल नंबरवरुन 7738299899 या नंबरवर मिस्ड कॉल द्यायचा आहे. यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल. या मेसेजमध्ये तुमचा पीएफ बॅलेंस दिसेल.

SMS द्वारे पीएफ करा चेक

तुम्ही SMS पाठवूनदेखील पीएफ चेक करु शकतात. यासाठी तुम्हाला 7738299899 या नंबरवर 'UAN EPFOHO ENG' असं टाइप करुन पाठवायचं आहे. जर तुम्हाला दुसऱ्या कोणत्या भाषेत हवं असेल तर त्या भाषेच्या शब्दाचे पहिले तीन अक्षर टाइप करुन पाठवा. तुम्हाला तुमच्या फोनवर एसएमएस मिळणार आहे. त्यात पीएफची माहिती असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party : खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीत अटक, कट्टर विरोधक गिरिश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

महिलांचा रस्त्यावर राडा! शेजारच्या वादातून सुरू झाली हाणामारी;VIDEO

Hyundai Kia SUV: ग्राहकांसाठी खुशखबर! ह्युंदाई आणि किआ लाँच करणार 3 नव्या कॉम्पॅक्ट मॉडेल्स

Pune Rave Party: भाजप म्हणजेच 'रेव्ह पार्टी', रोहिणी खडसेंच्या नवऱ्याला अटकेनंतर संजय राऊत संतापले

SCROLL FOR NEXT