EPFO PF Update google
बिझनेस

EPFO PF Update: EPFO चा मोठा निर्णय! आता PF चे पैसे अवघ्या 3 दिवसांत खात्यात

PF Withdrawal Rules: ईपीएफओने पीएफ क्लेम प्रक्रिया जास्त वेगवान करत ऑटो सेटलमेंटची मर्यादा ५ लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. पात्र सदस्यांना आता आवश्यक कागदपत्रे पूर्ण असल्यास तीन दिवसांमध्ये पीएफची रक्कम मिळू शकते.

Sakshi Sunil Jadhav

प्रत्येक कर्मचारी त्याच्या पगारातला काही भाग पीएफमध्ये जमा करतो. सध्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने आपल्या कोट्यावधी सदस्यांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. यामध्ये PF काढण्याची प्रक्रिया जलद, सोपी करण्यासाठी EPFO ने नवीन सेटलमेंट फ्रेमवर्क लागू केले आहे. या बदलामुळे पात्र सदस्यांचा पीएफ दावा फक्त तीन दिवसांमध्ये निकाली काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. गेल्या काही वर्षातल्या पीएफ सेटलमेंट प्रक्रियेतला हा सर्वात महत्त्वाचा बदल मानला जाणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आपल्या पैशांसाठी जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही.

नव्या नियमांनुसार, आवश्यक सर्व कागदपत्रे आणि केवायसी प्रक्रिया पूर्ण असलेल्या सदस्यांचे पीएफ दावे तीन दिवसांच्या आत मंजूर रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. तसेच, कोणतेही ठोस कारण नसताना २० दिवसांपेक्षा जास्त वेळ दावा थांबवून ठेवल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर १२ टक्के दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. पण ज्या प्रकरणांमध्ये जास्त पडताळणी गरजेची असेल, त्या दाव्यांच्या निकाली लागण्यास जास्त वेळ लागू शकतो.

याशिवाय, EPFO ने ऑटो सेटलमेंटची मर्यादा सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. याआधी मर्यादित रकमेपर्यंत उपलब्ध असलेली ही सुविधा आता थेट ५ लाख रुपयांपर्यंत लागू करण्यात आली आहे. डिजिटल पडताळणीला प्रोत्साहन देणे, कागदपत्रांची आवश्यकता कमी करणं, क्लेम नाकारण्याचे प्रमाण घटवणे आणि सदस्यांचा अनुभव जास्त चांगला करणे हा या निर्णयामागचा महत्त्वाचा उद्देश आहे.

पीएफच्या या सुविधांचा लाभ घेण्यासाठी सदस्यांचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) सक्रिय असणं गरजेचं आहे. तसेच UAN हा आधारशी लिंक असणे, पॅन आणि बँक खात्याची माहिती अचूक असणे, केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली असणे आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांक सक्रिय असणे गरजेचे आहे. या सर्व अटी पूर्ण करणाऱ्या सदस्यांना पीएफची रक्कम जलदगतीने खात्यात मिळण्याती शक्यता जास्त असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lord Krishna: महाभारतात श्रीकृष्णांनी शस्त्र न उचलण्याची प्रतिज्ञा का केली होती?

Maharashtra News Live Update: पालकमंत्री पदातील सर्व अडथळे दूर- मंत्री भरत गोगावले

Weight Loss: जिम आणि डाएटिंगशिवाय वजन कमी करायचंय? फिटनेस ट्रेनरने सांगितलेले 'हे' ७ रुल्स नक्की करा फॉलो

नागपूरच्या दोन नेत्यांमुळे मुंडेंनी भाजप सोडायचा निर्णय घेतला होता, माजी मुख्यमंत्र्यांचा मोठा गौप्यस्फोट, राजकारणात खळबळ

ओव्हरटेक करताना कार ट्रकला धडकली; देवदर्शनाला निघालेल्या ४ जणांचा करुण अंत

SCROLL FOR NEXT