EPFO  Saam tv
बिझनेस

EPFO शटडाऊन! ३ दिवस बंद राहणार PF पोर्टल, 'ही' कामं करताना येणार अडचणी; ५ पर्याय कोणते?

EPFO portal shutdown June 2026 latest update: पीएफ खातेधारकांसाठी महत्वाची बातमी आहे. कारण पीएफ पोर्टल २६ ते २८ जूनदरम्यान ३ दिवस बंद राहणार आहे.

Priya More
  • EPFO पोर्टल २६ ते २८ जूनदरम्यान बंद राहणार

  • डेटाबेस मायग्रेशन आणि सॉफ्टवेअर अपग्रेडमुळे राहणार बंद

  • PF क्लेम, ई-पासबुक आणि UAN सेवा प्रभावित होणार

पीएफ खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ईपीएफओ पोर्टल पुढच्या ३ दिवसांसाठी बंद राहणार आहे. ही सिस्टीम मायग्रेशन आणि सॉफ्टवेअर अपग्रेडमुळे ३ दिवस बंद केली जाणार आहे. त्यामुळे तुम्ही २६ ते २८ जून दरम्यान ईपीएफओ पोर्टलवर लॉग इन करू शकणार नाही. ज्यामुळे पीएफ काढण्यापासून ते पीएफ हस्तांतरणापर्यंतच्या सेवांवर परिणाम होणार आहे. याचसोबत हे पोर्टल बंद असणार असल्यामुळे तुम्हाला ऑनलाइन पीएफ क्लेम प्रक्रियेमध्ये देखील अडचणी येऊ शकतात.

कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (EPFO) याबाबत एक अधिकृत अधिसूचना जारी केली आहे की, ईपीएफओ ​​पोर्टल २६ जून ते २८ जून २०२६ या कालावधीत म्हणजेच २६ जून २०२६ रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते २८ जून २०२६ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत बंद राहील. पोर्टलवरील सर्व ऑनलाइन सेवा २९ जून २०२६ रोजी मध्यरात्री १२ वाजता पुन्हा सुरू होतील.

डेटाबेस एकत्रीकरण आणि सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन अपग्रेडमुळे ईपीएफओ​​ने ३ दिवसांसाठी पोर्टल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पोर्टलवर सुधारित सेवा मिळणार आहे. पार्टल बंद असताना पीएफ खातेधारक कोणतेही नवीन ऑनलाइन क्लेम करू शकणार नाहीत. यापूर्वी दाखल केलेल्या क्लेमच्या प्रक्रियेत व्यत्यय येऊ शकतो.

२६ ते २८ जून दरम्यान पीएफ खातेधारकांना खाली दिलेल्या सेवा उपलब्ध होणार नाहीत -

पीएफ काढण्याचा क्लेम

ई पासबुक सेवा

ईसीआर फाइलिंग

यूएएन अकाऊंट लिंकिंग

या ३ दिवसांच्या काळात तुम्हाला आपत्कालीन ईपीएफओ ​​सेवेची आवश्यकता असल्यास तुम्ही तुमच्या जवळच्या पीएफ ऑफिसशी संपर्क साधू शकता. मदतीसाठी तुम्ही ईपीएफओ​​च्या अधिकृत कॉल सेंटर हेल्पलाइन क्रमांक १४४७० वर संपर्क साधू शकता. तसंच, शटडाउन दरम्यान तुम्हाला तुमच्या पीएफ खात्याबद्दल माहिती हवी असल्यास तुम्ही उमंग ॲप, एसएमएस किंवा मिस्ड कॉल सेवेचा वापर करू शकता. याद्वारे तुम्ही तुमच्या पीएफ खात्यात शिल्लक राहिलेली रक्कम तपासू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुकाराम मुंढे यांचा सिया गोयलच्या वडिलांना दणका; पुण्यातील दुकानावर FDA ची मोठी कारवाई

ZP ची बनावट कागदपत्रं बनवून उभारली इमारत; शिंदे गटाच्या दोन नेत्यांना अटक

Sharad Pawar : महायुतीत चौथा भिडू येणार? पवारांच्या एन्ट्रीनं शिंदेंचं टेन्शन वाढणार?

जयंत पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, डिलिमिटेशनसाठी पवार एनडीएसोबत? दिग्गज नेत्याचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics: आमदार-नगरसेवक वाचवण्यासाठी धावाधाव; ठाकरे सेनेकडून डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न

SCROLL FOR NEXT