नोकरदारांसाठी आता एक खुशखबर आहे... आता तुमचीही सॅलरी वाढणार आहे... असं आम्ही का म्हणतोय.. कारण EPFO म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना मोठं पाऊल टाकण्याची शक्यता आहे...आता EPFO ची किमान वेतन मर्यादा 15 हजारावरून 25 हजार करण्याचा विचार सुरु आहे... ज्यामुळे नोकरदारवर्गाला फायदा होणार आहे.... तो कसा आणि कर्मचारी संघटनांची नेमकी काय मागणी आहे पाहूयात...
EPFO किमान वेतन मर्यादा 25 हजार करण्याचा प्रस्ताव आहे.. या प्रस्तावावर जानेवारी 2026 मध्ये EPFO बोर्डाच्या बैठकीत चर्चा होणार आहे.. या योजनेमुळे जास्त वेतन असणाऱ्यांना EPFO आणि EPS योजनेचा लाभ घेता येईल.. तसचं वेतन मर्यादा वाढवल्यास जवळपास 1 कोटी नवीन कर्मचारी योजनेच्या परिघात येतील.
दुसरीकडे कामगार संघटनांनी EPFO वेतन मर्यादा संदर्भात वेगळीच मागणी केलीय...EPFO कमाल वेतन मर्यादा किमान 30 हजार ते 40 हजार प्रति महिना करावी...तसेच EPFO आणि ESIची वेतन मर्यादा एकसमान करण्याची मागणीही करण्यात येतेय... आर्थिक निकष आणि महागाई दर यामुळे ही मागणी कामगार संघटनांनी केलीय...
एकीकडे 25 हजारपर्यंत वेतन वाढ करण्याचा प्रस्ताव आहे... अशातच कामगार संघटनांनी 30 ते 40 हजार वेतन मर्यादा करण्याची मागणी केल्यानं कामगार मंत्री मनसुख मांडवीय याच्यापुढे मध्यममार्ग शोधण्याची जबाबदारी असणार आहे... मात्र वेतन मर्यादा नेमकी किती असावी याबद्दल अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही..त्यामुळे EPFO बोर्डाच्या बैठकीत काय निर्णय होतो.. याकडे नोकरदाराचं लक्ष लागलयं...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.