EPFO Rule Saam Tv
बिझनेस

EPFO Rule: दिवाळीआधी गुड न्यूज! PF चे पैसे १०० टक्के काढता येणार, कागदपत्रांचीही गरज नाही, वाचा नवे नियम

EPFO New Rule: ईपीएफओने पीएफच्या नियमांत महत्त्वाचे बदल केले आहे. आता तुम्हाला पीएफ खात्यातून १०० टक्के रक्कम काढता येणार आहे.

Siddhi Hande

ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज

पीएफ खात्यातून काढता येणार १०० टक्के रक्कम

कोणत्याही कारणाशिवाय काढता येणार पैसे

ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ईपीएफओने आता कर्मचाऱ्यांना खुशखबर दिली आहे. काल सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजची बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यामध्ये ईपीएफओसंबंधित अनेक नियमांमध्ये बदल करण्यात आले. आता पीएफ खात्यातून पैसे काढणेही सोपे होणार आहे.

आता काढता येणार पीएफचे १०० टक्के पैसे (Now You Can Withdraw 100% PF)

ईपीएफओने जुने १३ नियम रद्द केले आहेत. आता तुम्ही पीएफ अकाउंटमधून संपूर्ण रक्कम काढू शकणार आहात. मेडिकल इमरजनसी, शिक्षण, लग्न, घर बांधकाम किंवा घर घेणे या गोष्टींसाठी तुम्ही पैसे काढू शकतात.

याआधी फक्त शिक्षण आणि लग्न या दोन गोष्टींसाठी ३ वेळा पैसे काढू शकत होता. आता तुम्ही शिक्षणासाठी १० वेळा तर लग्न खर्चासाठी ५ वेळा पैसे काढू शकतात. याचसोबत मिनिमम सर्व्हिस पीरियड १२ महिने केला आहे.

ऑटोमेटिक सेटलमेंट

आता तुम्ही पीएफच्या कामांसाठी कोणत्याही कागदपत्रांची गरज भासणार नाही. ईपीएफओची सर्व प्रक्रिया ऑटोमॅटिक होणार आहे. यामुळे तुमचा क्लेम लवकर होईल. फायनल सेटलमेंटची प्रोसेस २ महिन्यांवरुन १२ महिने केली आहे. पेन्शन काढण्याचा कालावधी २ महिन्यांपासून ३६ महिने केला आहे. यामुळे कर्मचारी सोप्या पद्धतीने पैसे काढू शकणार आहेत.

कोणत्याही कारणाशिवाय काढू शकणार पैसे

याआधी नैसर्गिर आपत्ती, साथीचा रोग किंवा बेरोजगारीसारख्या परिस्थितींमुळे पैसे काढण्यासाठी कारण आवश्यक होते. आता ही अट काढून टाकली आहे. आता तुम्ही कोणतेही कारण न देता पैसे काढू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Junnar ST Bus Accident: गुंजाळवाडीजवळ शेगाव-कल्याण एसटीचा भीषण अपघात; दोन ते तीनवेळा उलटली बस, दोघांचा मृत्यू, १७ जखमी

चित्रपटसृष्टी हादरली! प्रसिद्ध दिग्दर्शकाची आत्महत्या; नदीमध्ये सापडला मृतदेह

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! सिमेंट मिक्सरने दोघांना चिरडलं, वडिलांच्या डोळ्यासमोर ८ वर्षीय अहानाने सोडले प्राण

Dagdusheth Halwai Ganpati: पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट’ला 'अ' वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा

Diesel Crisis: परभणीत डिझेलची टंचाई, पेट्रोल पंपाबाहेर कॅन घेऊन रांगा; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT