
आजच्या धावपळीच्या आणि अनिश्चित काळात हेल्थ इन्शुरन्स घेणं हे गरजेचं झालं आहे. आज कोणाला, कधी, काय त्रास होईल याचा नेम नाही. त्यामुळे अशा वेळी आरोग्य विमा (Health Insurance) असणं ही काळाची गरज बनली आहे. मात्र आतापर्यंत बहुतांश विमा कंपन्यांकडून इन्शुरन्स क्लेम मिळवण्यासाठी किमान २४ तास रुग्णालयात दाखल राहणं आवश्यक असायचं.
याचसंदर्भात तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता या नियमात मोठा बदल करण्यात आला आहे. अनेक विमा कंपन्यांनी २४ तासांची अट काढून टाकली आहे. या बदललेल्या नियमानुसार, २ तास रुग्णालयात राहिल्यावरही क्लेम मिळू शकणार आहे.
वैद्यकीय क्षेत्रात सध्याच्या काळात झपाट्याने प्रगती होताना दिसतेय. आधी ज्या उपचारांसाठी ३-४ दिवस रुग्णालयात थांबावं लागायचं, तेच आता २-३ तासांत पूर्ण होताना दिसतात. मोतीबिंदू, पित्ताशयातील खडे, अॅपेंडिक्स यांसारख्या शस्त्रक्रिया अगदी कमी वेळात होतात. त्यातही आता रोबोटिक सर्जरीसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होतोय ज्यामुळे ऑपरेशन लवकर आणि सुरक्षित होतं.
याच कारणामुळे अनेक विमा कंपन्यांनी शॉर्ट टर्म हॉस्पिटलायझेशन म्हणजेच अल्पकाळासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांसाठी देखील इन्शुरन्स क्लेम मंजूर करण्यास सुरुवात केली आहे. रूग्णांसाठी ही बाब खूप महत्त्वाची ठरणार आहे.
सध्या खालील विमा कंपन्यांनी २४ तास हॉस्पिटलायझेशनची अट रद्द केली आहे:
ICICI लोम्बार्ड एलिवेट प्लान: १० लाख रुपयांचं कव्हर, ३० वर्षांच्या व्यक्तीसाठी वार्षिक प्रीमियम ₹9,195
केअर सुप्रीम हेल्थ इन्शुरन्स – १० लाखांचं कव्हर, प्रीमियम ₹12,790
नीवा बूपा हेल्थ इन्शुरन्स – १० लाख रुपयांचा कव्हर प्लान, प्रीमियम ₹14,199
या तिन्ही प्लॅन्समध्ये अल्पकालीन उपचारांसाठी देखील क्लेम उपलब्ध होतो.
या बदलामुळे अनेक रुग्णांना मोठा फायदा होणार आहे. उदाहरणार्थ मोतीबिंदू ऑपरेशन, कीमोथेरपी, एंजियोग्राफी, डायलिसिस अशा उपचारांसाठी काही तासच लागतात. मात्र, यापूर्वी केवळ २४ तासांपेक्षा कमी वेळात रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यास विमा कंपन्या क्लेम देत नाही. त्यामुळे अनेकांना खर्च स्वतःच्या खिशातून भरावा लागायचा.
आता या नव्या बदलांमुळे अल्पवेळेतील उपचारांवरही इन्शुरन्सचा लाभ मिळेल. रुग्ण आणि कुटुंबियांवरील आर्थिक ताण कमी होईल, आणि अनेकांना आवश्यक ते उपचार वेळेत घेता येतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.