Cervical cancer: सर्व्हायकल कॅन्सरचं निदान होण्यास उशीर का होतो? काय आहेत कारणं?

Reasons for delayed cervical cancer: गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर हा महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगांपैकी एक महत्त्वाचा प्रकार आहे. चांगली गोष्ट अशी आहे की, हा कर्करोग टाळता येण्याजोगा आहे.
Reasons for delayed cervical cancer
Reasons for delayed cervical cancersaam tv
Published On

कधी-कधी स्त्रीच्या आयुष्यातील काही सगळ्यात कठीण लढायांमधली एक लढाई स्वत:बरोबर सुरू असते. सततच्या शंका, न बोलणं आणि स्वत:ला प्राधान्य देताना वाटणारा संकोच या सगळ्या गोष्टींचा यामध्ये समावेश आहे. टाटा ट्रस्टची सार्वजनिक आरोग्य जागरुकता मोहीम “खुद से जीत” या झगड्याची दखल घेते. सर्व्हायकल कॅन्सरची वेळीच तपासणी करून घेण्याची आणि आपल्या आरोग्याची सूत्रं आपल्या हातात घेण्याची कळकळीची विनंती महिलांना याद्वारे केली जाते.

महिलांसाठी धोकादायक असा आजार

सर्व्हायकल कॅन्सर हा भारतीय स्त्रियांमध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळून येणारा दुसऱ्या क्रमांकाचा कॅन्सर आहे. या कॅन्सरमुळे दरवर्षी जवळजवळ ७५,००० जीव जातात. हे बहुतेकदा उशीरा निदान झाल्यामुळे होत असल्याचं दिसून आलंय. सुरुवातीच्या टप्प्यावर निदान झाल्यास बरं होण्याची मोठी शक्यता असते. शिवाय लवकर निदान झाल्याने हा आजार यशस्वीपणे हाताळला जाण्याचे प्रमाण ९५ टक्‍के आहे. मात्र अनेक स्त्रिया याची तपासणी वेळेवर करून घेत नाहीत.

मुख्य म्हणजे महिला सर्व्हायकल कॅन्सर आणि त्याच्या लक्षणांविषयी जागरुकतेचा प्रचंड अभाव असल्याने किंवा भीती, शरमेची भावना आणि अशा बाबतीत मौन बाळगण्याने या विलंबास हातभार लावणाऱ्या गोष्टींमुळे लक्षणांकडे दुर्लक्ष करत राहतात.

टाटा ट्रस्टने वर्षानुवर्ष समाजाच्या तळागाळातील घटकांशी साधलेल्या संवादातून त्याचाच भाग म्हणून गेल्या वर्षी राज्य सरकार आणि सहयोगी संस्थांच्या साथीने झारखंड, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि महाराष्ट्रात पार पाडलेल्या २६,००० हून अधिक सर्व्हायकल कॅन्सर तपासण्यांमधून या विषयावरील सखोल माहिती उघड केली आहे. यावेळी मदत उपलब्ध असूनही ती घेण्यापासून स्त्रियांना परावृत्त करणाऱ्या भावनिक आणि सामाजिक अडथळ्यांना लोकांसमोर आणलंय.

Reasons for delayed cervical cancer
हार्ट अटॅक अधिकतर सोमवारच्या दिवशीच का येतो?

जागरुकतेची प्रभावी सुरुवात करण्यासाठी टाटा ट्रस्टने एका परिसंवादाचे आयोजन केलं. ज्यामध्ये समस्या, स्क्रीनिंगमध्ये येणारे अडथळे, प्रमुख उपाययोजना यांचं स्वरूप मांडण्यासाठी आणि भारतामध्ये सर्व्हायकल कॅन्सरबद्दलच्या चर्चेला नवी दिशा कशी देता येईल, याचा शोध घेण्यासाठी ऑन्कोलॉजी, सायको-ऑन्कोलॉजी आणि रुग्ण आधार या क्षेत्रातील अग्रगण्य तज्ञ एकत्र आले.

या सत्रामध्ये सेंटर फॉर कॅन्सर एपिडेमियोलॉजी, टाटा मेमोरियल सेंटरच्या डेप्युटी डायरेक्टर डॉ. गौरवी मिश्रा, टाटा मेमोरिअल हॉस्पिटलच्या सायको-ऑन्कोलॉजिस्ट डॉ. सविता गोस्वामी आणि कॅन्सरवर मात केलेल्या आणि व्ही केअर फाउंडेशनच्या संस्थापक वंदना गुप्ता यांचा समावेश होता.

या सत्राचं सूत्रसंचालन टाटा कॅन्सर केअर फाउंडेशनच्या मेडिकल ऑपरेशन्स विभागच्या प्रमुख डॉ. रुद्रदत्ता श्रोत्रिय यांनी केलं. त्या म्हणाल्या, “सर्व्हायकल कॅन्सरचा भारतावरील भार १५ लाख डिसएबिलिटी-अॅडजस्टेड लाइफ इअर्स (DALYs) इतका आहे, ज्याचा सर्वाधिक प्रभाव सर्वात कमी जागरुकता आणि तपासणीच्या सुविधांचा सर्वाधिक अभाव असलेल्या सामाजिक स्तरातल्या ३०-६५ वयोगटातील स्त्रियांवर पडतो. जागरुकतेचं प्रमाण कमी असणं आणि संकोचाची भावना हीच आजही या सर्वात प्रमुख आव्हाने आहेत.

डॉ. श्रोत्रिय पुढे म्हणाल्या की, ज्या महिलांना सुरुवातीची लक्षणं अनुभवास येतात. त्या लक्षणांचा सर्व्हायकल कॅन्सरशी संबंध जोडत नाहीत. काहींनी हा संबंध जोडला तरीही शरमेच्या किंवा भीतीच्या भावनेमुळे त्या याबद्दल काही पाऊल उचलण्यास उशीर करतात. अगदी कोणतीही लक्षणं दिसली नाहीत तरीही या आजाराचा धोका असू शकतो. म्हणूनच तपासणी करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जागरुकता निर्माण करत सर्व्हायकल कॅन्सरविषयीच्या चर्चेला नवं वळण देण्यासाठी पावलं उचलत आम्ही जिथे महिलांच्या ठायी आपल्या आरोग्याला प्राधान्य देण्यासाठीची सक्षमता येईल अशा एका संस्कृतीची जोपासना करू शकू, अशी आम्हाला आशा आहे.”

Reasons for delayed cervical cancer
Early signs of heart disease: शरीरात दिसणारे 'हे' ८ बदल वेळीच ओळखा; हृदयाच्या आजारांचा धोका दर्शवतात लक्षणं, दुर्लक्ष नकोच!

टाटा ट्रस्टच्या कम्युनिकेशन स्पेश्यालिस्ट शिल्पी घोष म्हणाल्या, “स्त्रिया त्यांचं मौन त्यांची भीती, त्यांचा संकोच यांचा कानोसा घेण्यातून ‘खुद से जीत’चा जन्म झाला. सर्व्हायकल कॅन्सर ही केवळ एक वैद्यकीय समस्या नाही तर ती एक भावनिक समस्या आहे. सोयीसुविधांची उपलब्धता हा एकमेव अडथळा नाही तर त्यामागे एक शंकेचा सूर असतो, जो महिलांना कृती करू नका, बोलू नका किंवा स्वत:ला प्राधान्य देऊ नका असे सांगत असतो हे आमच्या लक्षात आले."

Reasons for delayed cervical cancer
Signs of liver disease on hands: लिव्हर खराब होत असताना हळूहळू हातांवर दिसून येतात 'ही' लक्षणं; वेळीच बदल ओळखून उपचार घ्या!

ही मोहीम म्हणजे महिलांना थोडा धक्का देत जागं करण्याचा... तुम्ही महत्त्वाच्या आहात, तुमचे आरोग्य महत्त्वाचं आहे हे तिला सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक चित्र चौकट, प्रत्येक शब्द आणि प्रत्येक संपर्कबिंदूच्या माध्यमातून आम्हाला तिला ही गोष्ट माहीत करून द्यायची आहे की ही आतली लढाई जिंकणं म्हणजे कदाचित तिच्यासाठी तिच्या तोडीचे आयुष्य मिळवणं असणार आहे, असंही शिल्पी घोष म्हणाल्यात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com