EPFO  Saam Tv
बिझनेस

EPFO: कोणत्या कारणासाठी काढू शकतात PF चे पैसे? मर्यादा किती? वाचा EPFO चा नियम काय सांगतो

EPFO PF Withdrawal Rules: ईपीएफओने पीएफ काढण्याच्या नियमात बदल केले आहेत. दरम्यान, तुम्ही लग्न, आजारपण किंवा घर खरेदी करण्याची पीएफ काढू शकतात. कोणकोणत्या कारणासाठी हे पैसे काढू शकतात, ते जाणून घ्या.

Siddhi Hande

EPFO चे पीएफ काढण्यासंबंधित नियम

कोणत्या कारणांसाठी काढू शकतात पैसे?

१०० टक्के पीएफ काढण्याचीही सुविधा उपलब्ध

प्रत्येक संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचे पीएफ अकाउंट असते. पीएफ अकाउंटमधील रक्कम ही एक गुंतवणूक असते. तुम्ही काही महत्त्वाच्या कारणांसाठी किंवा आप्तकालीन परिस्थितीत हे पैसे काढू शकतात. दम्यान, ईपीएफओने पीएफमधील पैसे काढण्यासाठी काही अटी ठेवल्या आहेत. तुम्ही काही परिस्थितींमध्ये १०० टक्के पीएफ काढू शकतात. दरम्यान, काही परिस्थितीमध्ये फक्त ७५ टक्के पैसे काढू शकतात.

ईपीएफओने अजून एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता वेटिंग पीरियड १३ महिन्यांवरुन ३ महिने केला आहे. याचसोबत १२ महिने नोकरी केल्यानंतरच तुम्हाला १०० टक्के पीएफ काढता येणार आहे.

कोणत्या कारणांसाठी काढू शकतात पीएफचे पैसे? (EPFO PF Withdrawal Reasons)

जर तुम्हाला घर खरेदी करायचे असेल किंवा घराचे बांधकाम करायचे असेल तर पीएफ खात्यातून ९० टक्के रक्कम काढू शकतात. जर खात्यात १ लाख रुपये असतील तर ९०,००० रुपये काढू शकतात. तसेच आजारपणात १०० टक्के पैसे काढू शकतात. भाऊ-बहीण किंवा मुलांच्या लग्नासाठी ७५टक्के रक्कम काढू शकतात. तुम्ही किती रक्कम गुंतवता यावर हे अवलंबून असते.

बेरोजगार असताना किती पैसे काढू शकतात?

सध्या नोकरीत १२ महिने पूर्ण झाले असतील तर ७५ टक्के पैसे काढू शकतात. यामुळे १ लाख रुपये असतील तर ७५००० रुपये काढू शकतात. जर तुम्ही २ महिन्यांसाठी बेरोजगार असाल तर १०० टक्के रक्कम काढू शकतात. परंतु ही सर्व्हिस नोकरीचा १ वर्षाचा कालावधी पूर्ण केल्यानंतरच असते. याआधी हा कालावधी ५ ते ७ वर्षांचा होता.

सेवानिवृत्तीनंतर किती पैसे मिळतात?

सेवानिवृत्तीनंतर तुम्ही पीएफ खात्यातील सर्व पैसे काढू शकतात. ईपीएफओच्या नवीन नियमांनुसार, पैसे काढणे खूप सोपे झाले आहे. तुम्हाला आता ऑनलाइन पद्धतीने सर्व रक्कम काढता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nitish Kumar: मुख्यमंत्र्यांनी दिला आमदारकीचा राजीनामा! मोदी सरकारमध्ये मंत्रीपद मिळणार?

Bigg Boss Marathi 6 : "लांब व्हा..."; बिग बॉसचा पारा चढला; 'तिकीट टू फिनाले'साठी २ सदस्यांनी घरात घातला राडा | VIDEO

Maharashtra Live News Update :मुंबईचे डबेवाले आजपासून सहा दिवस सुटीवर

New Labour Law: १ एप्रिलपासून नवीन कामगार कायदा; पगार होणार कमी; PF, ग्रॅच्युटीमध्येही बदल

Weekly Horoscope: मेष ते मीन राशींसाठी हा आठवडा कसा असणार? राशीनुसार काय खास घडणार ते वाचा

SCROLL FOR NEXT