EPFO New Rule Saam tv
बिझनेस

EPFO कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! १२ वर्षांपूर्वीचे नियम केले पुन्हा लागू; पेन्शन वाढण्याची शक्यता

EPFO New Rules 2026: ईपीएफओने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता पेन्शन योजनेतील योगदान मूळ पगाराशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पेन्शन वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Siddhi Hande

EPFO कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

१२ वर्षांपूर्वीचा नियम पुन्हा एकदा लागू

कर्मचारी पेन्शन योजनेतील योगदान मूळ पगाराशी जोडले

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ईपीएफओने १२ वर्षांपूर्वीचा नियम पुन्हा एकदा लागू केला आहे. मिडिया रिपोर्टनुसार, कर्मचारी भविष्य निर्वाह निध संघटनेने कर्मचारी पेन्शन योजनेतील योगदान पुन्हा एकदा मूळ पगाराशी जोडण्याचा पर्याय लागू केला आहे. त्यामुळे आता पेन्शन ही तुमच्या मूळ पगारावर मोजली जाणार आहे.

२०१४ च्या नियमांमध्ये दुरुस्ती केली आहे. यामध्ये लादलेले निर्बंध काढण्यात आले आहे. यामध्ये पेन्शनयोग्य पगार १५,००० रुपयांपर्यंत मर्यादित झाला होता. यामुळे सदस्यांसाठी पेन्शन मोजण्याच्या पद्धतीवर परिणाम झाला होता. यामुळे पेन्शन वाढेल, असे मानले जाते.

या नवीन बदलाचा परिणाम कट ऑफ तारखेपूर्वी जास्त ईपीएस योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांना होणार आहे. या अहवालानुसार, सप्टेंबर २०१४ मध्ये पेन्शनयोग्य वेतन मर्यादा निश्चित केली होती. यानंतर अनेक दिवस गोंधळ सुरु होता. त्यानंतर आता हा निर्णय घेण्यात आला आहे.

ईपीएफओने ईपीएस पेन्शन कॅप कधी सुरु केली?

१ सप्टेंबर २०२४ रोजी ईपीएफओने मासिक पेन्शन १००० रुपये निश्चित केली होती. याचसोबत सरकारी संस्थेने पेन्शनयोग्य पगार १५००० निश्चित केला. यामध्ये मूळ पगार आणि महागाई भत्त्याचा समावेश आहे. १५००० रुपयांच्या पेन्शन कॅपमुळे कमाल ईपीएस पेन्शन ७,५०० रुपये निश्चित होते. दरम्यानस मूळ पगाराच्या आधारे पेन्शन निवडण्याची परवानगी नव्हती. यामुळे ज्या ईपीएफओ सदस्यांचा पगार आणि डीए १५००० रुपयांपेक्षा जास्त आहे त्याची पेन्शन कमी होऊ शकते.

पेन्शनचे नियम काय?

ईपीएफओच्या नियमानुसार, पीएफ खात्यात नियोक्ता आणि कर्मचारी दोघेही पगारातील १२ टक्के रक्कम भविष्य निर्वाह निधीत जमा करतात. यामधील नियोक्त्याचे ८.३३ टक्के योगदान पेन्शनमध्ये जमा केले जाते. पुढे भविष्यात हेच पीएफ आणि पेन्शनचे पैसे कर्मचाऱ्यांना दिले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tilache Tel: रात्री झोपण्यापूर्वी तिळाच्या तेलाचे २ थेंब नाभीत सोडा, १५ दिवसांत दिसेत रिझल्ट

Maharashtra News Live Update: दुष्काळ घोषणेवर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया; चंद्रपूरमधील सुटलेल्या तालुक्यांसाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी

दोन शहरात भीषण गोळीबार; 27 जणांचा मृत्यू, 15 गंभीर जखमी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Egg For Diabetes: डायबिटीज असणाऱ्यांनी अंडी खावी की नाही? जाणून घ्या

खासदार-आमदारांची पळवापळवी! २०२२ पासून १११ नेत्यांनी बदलला पक्ष, भाजप दुसऱ्या क्रमांकावर; आकडेवारी पाहून चक्रावून जाल

SCROLL FOR NEXT