EPFO  Saam Tv
बिझनेस

Pension Hike: महत्त्वाची बातमी! EPFO कर्मचार्‍यांची पेन्शन ₹६५००नी वाढणार? सरकारने एका झटक्यात विषय संपवला

EPFO Pension Hike News: ईपीएफओ पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ईपीएफओ सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये वाढ करण्याची मागणी केली जात होती. दरम्यान, याबाबत कोणताही प्रस्ताव नसल्याचे सरकारने सांगितलं आहे.

Siddhi Hande

EPFO पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी

बेसिक पेन्शन १००० रुपयांवरुन ७,५०० होणार?

केंद्र सरकारने नक्की काय सांगितलं?

ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता पीएफधारकांना मिळणारी पेन्शन वाढण्याची शक्यता आहे. सरकार बेसिक पेन्शन १००० रुपयांवरुन ७,५०० रुपये करण्याच्या तयारी आहे, असं सांगण्यात येत होते. आता यावर सरकारने आपले मत मांडलं आहे.

ईपीएफओ कर्मचाऱ्यांची पेन्शन वाढवण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात होती. दरम्यान, यावर सरकारने आपले मत मांडले आहे. राज्यसभेत श्रम मंत्रालयाने सांगितले की, सध्याची बेसिक पेन्शन १००० रुपयांवरुन ७,५०० करण्याचा कोणत्याही प्रस्ताव नाहीये. कोणताही निर्णय घेताना पेन्शन फंडची आर्थिक स्थिरता लक्षात घेणे गरजेचे आहे.

संसदेत काय झालं?

संसंदेत राज्यसभा सदस्य डॉ. मेधा विश्राम कुलकर्णी यांनी विचारले की, सध्या महाराष्ट्रात EPS-95 पेन्शनधारकांना बेसिक पेन्शन १००० रुपयांवरुन ७,५०० करण्याची मागणी केली जात आहे. सध्याच्या महागाईच्या काळात ही पेन्शन खूप कमी आहेत. त्यामुळे किमान पेन्शन सुधारण्यासाठी सरकारकडे काही वेळापत्रक आहे का, असा प्रश्न त्यांनी विचारला.

कामगार आणि रोजगार राज्यमंत्री सुश्री शोभा करंदलाजे यांनी सांगितले की, कर्मचारी पेन्शन योजना १९९५ ही सामाजिक सुरक्षा देणारी योजना आहे. हा निधी दोन स्त्रोतांपासून तयार केला जाते. यामध्ये नियोक्त्याचे वेतन ८.३३ टक्के असते. केंद्र सरकार दर महिन्याला १५००० रुपयांच्या वेतनावर १.१६ टक्के योगदान देते. ईपीएस पेन्शनधारकांना दर महिन्याला १००० रुपये दिले जाते. ईपीएस ९५ अंतर्गत पेन्शन निधीचे वार्षिक मूल्यांकन करणे अनिवार्य आहे. या मूल्यांकनाचा उद्देष उत्पन्नाची भविष्यातील पेन्शन पेमेंट खर्चाशी तुलना करुन सध्याच्या निधीचे मूल्यांकन करणे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : मित्रांसोबत दिवस आनंदात जाईल, ७ राशींच्या व्यक्तींना होणार धनलाभ; वाचा आजचे राशीभविष्य

Nanded Flood : वर्षांनंतरही 'त्या' रात्रीची धडधड कायम! नांदेडच्या हसनाळ गावात १८ ऑगस्ट २०२५ ला नक्की काय घडलं होतं?

Diabetes Diet Tips: डायबिटीजमध्ये साखर खावी की नाही? रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी साखरेऐवजी हे 3 पर्याय बेस्ट

Maharashtra News Live Update: यवतमाळ जिल्ह्यात दोन लाख 62 हजार मतदारांचा शोध लागेना

मराठी शिकण्याची अंतिम मुदत संपली; 7750 रिक्षावाल्यांचं लायसन्स जाणार?

SCROLL FOR NEXT