सेवानिवृ्त्तीनंतर कर्मचाऱ्यांना दर महिन्याला पगार मिळत नाही. त्यामुळेच त्यांना पेन्शन असते. ही पेन्शन मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांना आतापासूनच पीएफ खात्यात पैसे जमा करावे लागतात. पीएफ खात्यातील पैसे ही एक गुंतवणूक असते. तुम्ही अडचणीच्या काळात हे पैसे काढू शकतात. यामुळे तुम्हाला घर खरेदी करताना, मुलीच्या लग्नासाठी जास्त आर्थिक ताण येणाक नाही. दरम्यान, काही ठरावीक कारणांसाठीच तुम्ही पीएफचे पैसे काढू शकतात.
पीएफचे पैसे काढण्यासाठी तुम्हाला फॉर्म नंबर ३१ भरावा लागतो. यासाठी काही अटी आहेत. तुम्ही कोणत्या कारणासाठी पैसे काढता ते योग्य आहे की नाही याची पडताळणी केल्यानंतरच तुम्हाला पैसे दिले जातात.
या कारणांसाठी काढू शकतात PF चे पैसे (PF Withdrawal Reasons)
गृहकर्ज, जमीन खरेदी, घर खरेदी किंवा घराचे बांधकाम करण्यासाठी तुम्ही हे पैसे काढू शकतात.
कारखाना, कंपनी बंद झाल्यावर
मेडिकल इमरजन्सीसाठीदेखील तुम्ही पैसे काढू शकतात.
स्वतः चे लग्न, मुलगा, मुलगी, भाऊ किंवा बहिणीच्या लग्नासाठी
उच्च शिक्षणासाठी
नैसर्गिक आपत्ती असल्यास तुम्ही पीएफचे पैसे काढू शकतात.
PF चे पैसे काढण्यासाठी अटी (PF withdrawal Conditions)
ईपीएफओमधून PF खात्यातील पैसे काढण्यासाठी तुमचा UAN नंबर अॅक्टिव असणे गरजेचे आहे. याचसोबत मोबाईल नंबर लिंक असावा. यानंतर तुम्ही पैसे काढू शकतात.
PF मधीन पैसे काढण्यासाठी EPFO अकाउंटचा डेटाबेस सीड असणे गरजेचे आहे. जेव्हा तुम्ही फॉर्म ३१ सबमिट करतात तेव्हा UIDAI तुम्हाला केवायसी करण्यासाठी ओटीपी पाठवतो.
बँक खाते आणि IFSC कोडसह EPFO डेटाबेसशी सीड असणे गरजेचे आहे.
जर कोणताही कर्मचारी ५ पेक्षा कमी वर्षांसाठी कंपनीत काम करत असेल त्याला ईपीएफओ डेटाबेसमध्ये पॅन नंबर टाकावा लागेल.
याचसोबत कर्मचाऱ्याची जॉइनिंगची तारीख ईपीएफओ डेटाबेसमध्ये उपलब्ध असावी.
PF साठी ऑनलाइन कसं करावं? (How To Apply For PF Withdrawal)
सर्वात आधी ईपीएफओच्या वेबसाइटला भेट द्या.
त्यानंतर यूएएन नंबर टाकून लॉग इन करा.
यानंतर तुम्हाला केवायसी आणि सर्व अटी वाचायच्या आहेत.
यानंतर तु्ही संबंधित दाव्यासाठी ऑप्शन निवडायचा आहे. फॉर्म ३१ किंवा फॉर्म १९ निवडायचा आहे.
यानंतर तुम्हाला रजिस्टर मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. यानंतर तुमचा पीएफसाठीचा अर्ज सबमिट होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.