EPF  Saam Tv
बिझनेस

EPFO News: काही मिनिटांत काढा पीएफ; त्याआधी हे काम कराच; वाचा सविस्तर

EPF Withdrawal Rules: पीएफ खात्यातून पैसे काढणे खूप सोपे झाले आहे. अनेकदा काही कारणांमुळे पीएफ क्लेम नाकारला जाऊ शकतो. त्यामुळे पीएफ काढण्याआधी या गोष्टींची काळजी घ्या.

Siddhi Hande

ईपीएफ खात्यातून पैसे कसे काढायचे?

पैसे काढताना अडचणी येतायत तर या गोष्टी करा

ईपीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी सिंपल प्रोसेस करा फॉलो

पीएफ अकाउंटमध्ये तुम्ही जी रक्कम गुंतवता ती एक गुंतवणूक असते. दर महिन्याला तुमच्या अकाउंटमधील ठरावीक रक्कम ईपीएफ खात्यात जमा केली जाते. दरम्यान, हे पैसे काढण्याची परवानगीदेखील कर्मचाऱ्यांना असते. काही परिस्थितींमध्ये तुम्ही पैसे काढू शकतात. परंतु अनेकदा पैसे काढताना खूप अडचणी येतात. अनेकदा कागदपत्रे पूर्ण नसल्याने किंवा रेकॉर्डमध्ये मॅच होत नसल्याने कर्मचाऱ्यांना वाट पाहावी लागते. अशा परिस्थितीत तुम्ही नेहमी काळजी घ्यायची असते.

तुमची माहिती अपडेट करा

तुम्हाला सर्वात आधी तुमचे नाव, जन्मतारीख, आधार नंबर, पॅन कार्ड याबाबत माहिती चेक करणे गरजेचे आहे. ईपीएफ रेकॉर्डमध्ये तुमची ही माहिती चुकीची नसायला हवी. अन्यथा पीएफ काढताना तुमचा अर्ज नाकारला जाऊ शकतो. यासाठी तुम्हाला पोर्टलवर जाऊन केवायसी करणे गरजेचे आहे. यामध्ये तुमची माहिती वेरिफाइड आहे की नाही चेक करा. जर एखादी माहिती अपडेट करायची बाकी असेल तर ती लवकरात लवकर करा.

पोर्टलवर क्लेम स्टेट्‍स चेक करा

आता कर्मचाऱ्यांना पोर्टलवर जाऊन क्लेम स्टेटस चेक करता येणार आहे. यावरुन तुमची रिक्वेस्ट प्रोसेसमध्ये आहे की नाही हे समजेल. अनेकदा क्लेम प्रोसेस होतो परंतु तो अकाउंटमध्ये दिसायला वेळ लागतो.जर तुम्हाला पोर्टलवर क्लेम स्टेटसमध्ये सेटल असं दिसलं आणि अकाउंटमध्ये पैसे जमा झाले नसतील तर बँक स्टेटमेंट चेक करा.

जर क्लेमचे काही पैसे क्रेडिट झाले असतील तर

अनेकदा क्लेमचे काही पैसेच बँक अकाउंटमध्ये जमा होतात.ईपीएफफ बॅलेंसमधील एक हिस्सा दिला जातो. सर्वात आधी कर्मचाऱ्याचा हिस्सा दिला जातो. त्यानंतर नियोक्त्याचा हिस्सा सर्व्हिस डिटेल्स व्हेरिफिकेशन पेंडिंग असते. यासाठी तुम्ही पासबुक चेक करा. यावरुन तुम्हाला सर्व माहिती मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs NZ 1st T20: पहिल्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडचा फडशा पाडला, मालिकेत 1-0 ने आघाडी

धावत्या लोकल ट्रेनमध्ये चोरट्याने बदलापूरच्या तरुणाला धक्का दिला; चाकाखाली आल्याने पायाचे तुकडे, डोक्यालाही दुखापत

Daldal Trailer Out: नुसती कापाकापी! हिंसा पाहून अंगावर येईल काटा, थरकाप उडवणारा ‘दलदल’चा ट्रेलर प्रदर्शित

Thursday Horoscope : तुमच्याविरुद्ध कोणीतरी कट रचण्याची शक्यता; ५ राशींच्या लोकांना सावध निर्णय घ्यावा लागणार

भयंकर! अंगात कपडे नव्हते, हातात लाकडी दांडा; मनोरुग्णाच्या जीवघेण्या हल्ल्यात वृद्धाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT