EPFO New Rule Saam Tv
बिझनेस

EPFO New Rule: पीएफची २ महिन्याची 'ती' अट रद्द, EPFO ने घेतला मोठा निर्णय, नव्या नियमाचा तुम्हाला किती फायदा?

EPFO New Decision of PF Withdrawal: ईपीएफओने पीएफच्या नियमात काही महत्त्वाचे बदल केले आहे. यामध्ये आता बेरोजगार तरुणांना २ ऐवजी १२ महिन्यात पीएफचे सर्व पैसे काढता येणार आहेत.

Siddhi Hande

ईपीएफओचा मोठा निर्णय

दोन महिन्यात पीएफ काढण्याची अट रद्द

आता बेरोगजगार असल्यावर १२ महिन्यानंतर काढता येणार पीएफ

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ईपीएफओने आता पीएफ काढण्याच्या काही नियमात महत्त्वपूर्ण बदल केले आहे. आता बेरोजगार असल्यावर ईपीएफ खात्यातील संपूर्ण रक्कम काढण्यासाठी १२ महिन्याची वाट पाहावी लागणार आहे. याआधी तुम्ही बेरोजगार झाल्यानंतर २ महिन्यात पीएफचे पूर्ण पैसे काढू शकत होता. आता या नियमांत बदल करण्यात आले आहे.

पेन्शनच्याही नियमात बदल (Pension Rule Change)

याआधी तुम्हाला जसे बेरोजगार असल्यावर दोन महिन्यात पैसे काढता येत होते. दरम्यान, पेन्शन काढण्यासाठीही दोन महिन्याची मुदत होती. आता या नियमातही बदल केले आहे. तुम्ही आता ३६ महिन्यानंतर पेन्शनची संपूर्ण रक्कम काढू शकतात. ईपीएफओने सोमवारी झालेल्या सीबीटी बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

याआधी जर कर्मचारी सलग दोन महिने बेरोजगार असेल तर त्याला दोन महिन्यात पीएफ किंवा पेन्शन खात्यातील पैसे काढता येत होते. आता या नियमात बदल झाले आहेत. तुम्हाला पीएफ काढण्यासाठी १२ महिने तर पेन्शन काढण्यासाठी ३६ महिन्याची वाट पाहावी लागणार आहे.

काय परिणाम होणार?

ईपीएफओच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की,या मुदतवाढीचा उद्देश असा आहे की, कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळत राहावे, याची खात्री करणे.दरम्यान, नवीन नोकरी मिळाल्यानंतर कर्मचारी पुन्हा ईपीएफओमध्ये सहभागी होतात. दोन महिन्याच्या बेरोजगारीनंतर जर त्यांनी निधी काढला तर त्यांना पेन्शन आणि इतर लाभ मिळणार नाही. पेन्शन मिळवण्यासाठी दहा किंवा त्यापेक्षा जास्त वर्षे सर्व्हिस करावी लागते.

कामगार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आता तुम्हाला पीएफची संपूर्ण रक्कम काढायची असेल तर १ वर्ष आणि पेन्शनचा निधी काढायचा असेल तर तीन वर्षे वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान, आता पीएफच्या अजून नियमात बदल केले आहे. आता तुम्ही पीएफ खात्यातून १०० टक्के रक्कम काढू शकतात.परंतु यासाठी एक अट आहे. कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या योगदानातील २५ टक्के रक्कम ठेवावी लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुमचं WhatsAPP कुणीतरी वाचतंय? लीक झालेल्या डेटात तुमचाही नंबर? VIDEO

Maharashtra Politics : 'उदय सामंत शिंदेसेना फोडणार'; ठाकरे गटाच्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

Friday Horoscope : वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता; ५ राशींच्या लोकांना अडचणीवर मात करावी लागणार

Uddhav Thackeray : साधू हत्याकांडातील आरोपीला भाजपमध्ये प्रवेश म्हणजे हिंदुत्वाचा अपमान? उद्धव ठाकरे कडाडले

कोकणात राणे बंधू आमने-सामने, भावांच्या संघर्षाला नारायण राणेंचा आशीर्वाद?

SCROLL FOR NEXT