EPFO Rule Saam Tv
बिझनेस

EPFO New Rule: EPFO च्या नियमात मोठा बदल! पेन्शनधारकांसाठी घेतला महत्त्वाचा निर्णय

EPFO New Rule: पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता पीएफ खात्यातून पैसे काढणे अधिक सोपे होणार आहे. तुम्हाला पीएफचे पैसे काढण्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची गरज भासणार नाहीये.

Siddhi Hande

देशातील कोट्यवधि कर्मचाऱ्यांचे पीएफ खाते आहेत. पीएफ खात्यात दर महिन्याला तुमच्या पगारातील काही रक्कम जमा केली जाते. यातील काही रक्कम नियोक्त्याकडूनही जमा केली जाते. पीएफ खात्यातील जमा रक्कमेवर तुम्हाला व्याज मिळते. त्यामुळेच पीएफ खात्यातील पैसे ही एक गुंतवणूक असते. दरम्यान, सेवानिवृत्तीनंतर तुम्ही पीएफ खात्यातून पैसे काढू शकतात. आता हे पैसे काढणे अजूनच सोपे होणार आहे. ईपीएफओने पीएफ खात्यातून पैसे काढण्याच्या नियमात बदल केले आहेत.

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पीएफ खात्यातून पैसे काढताना अनेक अडचणी यायच्या. आता ही प्रक्रिया अधिक सोपी आणि सुरक्षित केली आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी ईपीएफओच्या नियमात बदल केले आहे.

पीएफ काढण्याचे नियम काय आहेत? (PF withdrawal Rule)

पीएफ खात्यातून पैसे काढताना तुम्हाला अनेक कागदपत्रे द्यावी लागायची. परंतु आता तुम्हाला असे काहीही करण्याची गरज नाही. तुम्ही कोणत्याही कागदपत्राशिवाय पीएफ खात्यातून पैसे काढू शकतात. दरम्यान, सध्याच्या नियमानुसार, जर एखादा व्यक्ती एक महिन्यापेक्षा जास्त दिवस बेरोजगार आहे तर ते पीएफ खात्यातून ७५ टक्के रक्कम काढू शकतात. दरम्यान, आता या नियमातही बदल करण्यात आले आहेत.

कर्मचाऱ्यांना पीएफ अकाउंटमध्ये कमीत कमी २५ टक्के रक्कम ठेवावी लागते. सध्या या अकाउंटवर ८.५ टक्के व्याज मिळते. त्यावर चक्रव्याढ व्याजदेखील दिले जाते. नोकरी सोडल्यानंतर तुम्ही पुर्ण पैसे काढले तर तुमचा पेन्शनचा कालावधीदेखील कमी होतो. पेन्शनसाठी तुम्ही कमीत कमी दहा वर्षे नोकरी करणे गरजेची आहे.

आता या नियमानुसार, तुम्ही तुमची ही सेवा निरंतर काळासाठी ठेवू शकतात. याचा तुमच्या पेन्शनवर काहीच परिणाम होत नाही. यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना खूप फायदा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: काही काळासाठी पक्षप्रमुखपद गोठवण्यात आलं होतं: कौल

Suntwada Recipe: कृष्ण जन्माष्टमीला घरच्या घरी बनवा पारंपरिक सुंठवडा; साहित्य अगदी मोजकंच

Eyebrow : आयब्रोचे केस पातळ झालेत? या ७ आजारांची असू शकतात गंभीर लक्षणं

Kalyan - Dombivli Politics : भाजप-शिंदेसेना महायुती तुटणार? मनसेवरून मिठाचा खडा; संघर्ष चिघळण्याची शक्यता

Shiv Thackeray: टीव्हीनंतर आता मोठ्या पडद्यावर शिव ठाकरेची एंट्री; 'रक्तनीती'मधून करणार मराठी सिनेसृष्टीत एन्ट्री

SCROLL FOR NEXT