EPFO  Saam Tv
बिझनेस

EPFO News: EPFOच्या नियमात बदल; लग्नकार्य आणि घर खरेदीसाठी EPF खात्यातून पैसे काढता येणार, कसा कराल अर्ज?

EPFO Claim Auto Settlement : प्रत्येक कर्मचाऱ्याचे बँकेत ईपीएफ खाते असते. ईपीएफ खात्यामधून पैसे काढणे पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे. EPFO ने ऑटो- मोड सेटलमेंट सुरु केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रत्येक कर्मचाऱ्याचे बँकेत ईपीएफ खाते असते. ईपीएफ खात्यामधून पैसे काढणे पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे. EPFO ने ऑटो- मोड सेटलमेंट सुरु केले आहे. त्यामुळे कोट्यवधी लोकांचा फायदा होणार आहे. जर तुमच्या घरात काही आपत्कालीन परिस्थिती असेल किंवा घरात कोणचे लग्न असल्यास तुम्ही पैसे काढू शकतात. हे पैसे कसे काढता येणार? याचा फायदा कोणाला मिळणार आहे? याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

ऑटो सेटलमेंटमध्ये कर्मचारी आपत्कालीन परिस्थितीत ईपीएफमधून पैसे काढू शकतात. EPFO सदस्यांना फक्त आपत्कालीन परिस्थिती पैसे काढण्याची परवानगी देते. यामध्ये आजारपण, शिक्षण, लग्न, घर यांचा समावेश होतो. यापैकी कोणत्याही गोष्टीसाठी तुम्ही पैसे काढू शततात. ऑटो सेटलमेंट मोड २०२० मध्येच सुरु करण्यात आला होता. यात तुम्ही फक्त आजारपणासाठीच ईपीएफ खात्यातून पैसे काढू शकत होते. मात्र, आता आजारपणासह शिक्षण, लग्न आणि घर खरेदीसाठीदेखील पैसे काढू शकणार आहात.

ईपीएफओने अॅडव्हान्सची मर्यादादेखील वाढवण्यात आली आहे. याआधी ही मर्यादा ५० हजार रुपये होती. ती आता १ लाख रुपये झाली आहे. तुम्ही पैसे काढण्यासाठी ऑटो सेटलमेंटचा मार्ग निवडू शकतात. यामध्ये तीन- चार दिवसांत ग्राहकांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात येतात. ईपीएफओमध्ये कल्मे सेटलमेंटसाठी काही कागदपत्रे आवश्यक असतात. यामध्ये KYC, दाव्याच्या विनंतीची पात्रता, बँक खात्याची माहिती द्यावी लागेल. ही सर्व माहिती योग्य असेल तरच ऑटो मोडमध्ये त्वरित प्रक्रिया सुरु होते.

अर्ज कसा कराल

सर्वप्रथम EPFO पोर्टलवर लॉग इन कराने. यासाठी UAN आणि पासवर्ड आवश्यक आहे.

यानंतर ऑनलाइन सेवा यावर क्लिक करा. यानंतर दावा विभाग निवडावा लागेल.

तुम्हाला तुमचे बँक खाते वेरिफाय करावा लागेल. या बँक खात्यात तुमचे पैसे जमा होतील.

कुम्हाला बँक खात्याच्या चेकची स्कॅन केलेली प्रत आणि पासबुकची प्रत अपलोड करावी लागेल. यानंतर कोणत्या कारण्यासाठी तुम्हाला पैसे हवे आहेत, त्याची माहिती द्यावी लागेल.

दाव्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमची माहिती चेक केली जाईल. त्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Corporation School : महापालिकेच्या ६५ पैकी तब्बल ४५ मराठी शाळा बंद; धुळे शहरातील धक्कादायक वास्तव

Fashion Inspired By GenZ Actress: नव्या ट्रेंडसाठी या जेन झी अभिनेत्रींची फॅशन टिप्स करा फॉलो

Kapil Sharma Cafe: कपिल शर्माच्या ज्या कॅफेवर गोळीबार झाला तो 'कॅप्स कॅफे' कुठे आहे?

अजित पवारांवर बोलताना लक्ष्मण हाकेंची जीभ घसरली, म्हणाले- ते महाजातीयवादी...VIDEO

Bike Ride: ९० ते १२२ बीएचपी पॉवर असलेल्या बजेट परफॉर्मन्स बाईक्स, रायडिंगसाठी सर्वोत्तम पर्याय

SCROLL FOR NEXT