सर्वात मोठी बातमी! शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळ चिन्हावर निवडणूक लढणार?

pune political news : पुण्यात शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळ चिन्हावर निवडणूक लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबतचा प्रस्ताव देखील अजित पवारांनी शरद पवार गट्यांना दिला आहे.
Sharad pawar news
ajit pawar newsSaam tv
Published On
Summary

पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतील हालचालींना वेग आलाय

अजितदादांचा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन घड्याळ चिन्हावर लढण्याचा प्रस्ताव आहे

दोन्ही राष्ट्रवादीत जागावाटपावर कोणताही मोठा वाद नसल्याची माहिती

राष्ट्रवादी-शिवसेना युतीबाबतही पुण्यात चर्चा सुरू आहे

सागर आव्हाड, साम टीव्ही

पुण्यात महापालिका निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून जोरदार चाचपणी सुरू झाली आहे. पुणे महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. दोन्ही पक्षातील नेत्यांनी बैठकांचा सपाटा देखील लावला आहे. तर या निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादीचे उमेदवार घड्याळ चिन्हावर लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज शुक्रवारी दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत दोन राष्ट्रवादी एकाच्या चिन्हावर निवडणूक लढवतील, असा प्रस्ताव अजित पवारांनी शरद पवार गटाच्या नेत्यांना दिला. अजित पवारांचा निरोप आज शशिकांत शिंदे यांना थोड्यावेळात कळवळा जाणार आहे.

Sharad pawar news
थर्टी फर्स्टसाठी फिरायला जाण्याचा प्लान करताय? लोणावळ्यातील महत्त्वाचे पॉईंट्स राहणार बंद; कारण काय?

बैठकीत दोन्ही राष्ट्रवादीमध्ये जागा वाटपाची कोणतीही अडचण नाही. या युतीची आज रात्री किंवा उद्या युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र घड्याळ चिन्ह राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला मान्य होणार का ? हे पाहावे लागेल. आज संध्याकाळपर्यंत निरोप द्या, अजित पवारांनी असा प्रस्ताव बैठकीला आलेल्या नेत्यांकडे दिला आहे.

पुण्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना युतीची चाचपणी

तत्पूर्वी, पुण्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना युतीची चाचपणी सुरु आहे. दोन पक्षांमध्ये संवाद सुरू आहे. भाजप शिवसेनेला सन्मान जनक जागा द्यायला तयार नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून शिवसेनेसोबत चर्चा सुरू असल्याची माहिती हाती आली आहे.

Sharad pawar news
शरद पवारांना मोठा धक्का; पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांचा राजीनामा

पुण्यातील शिवसेनेचा एक मोठा नेता यासंदर्भात प्रस्ताव घेऊन एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेला होता. अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना पुणे महानगर पालिका एकत्र लढविण्यासंदर्भात चर्चा सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com