EPFO New Scheme 2026 google
बिझनेस

EPFO New Scheme : EPFO ची मोठी घोषणा! फक्त 6 महिन्यांसाठी नवी योजना, कोणाला मिळणार फायदा?

EPFO Amnesty Scheme : ईपीएफओने पात्र पीएफ ट्रस्टसाठी ६ महिन्यांची विशेष माफी योजना सुरू केली आहे. या योजनेमिळे नियमितीकरण, सूट अधिसूचना आणि काही नियमांमध्ये सवलत मिळणार असून पात्र संस्थांना मोठा दिलासा मिळेल.

Sakshi Sunil Jadhav

प्रत्येक कर्मचारी त्यांच्या पगारातला काही भाग पीएफमध्ये जमा करत असतो. त्याने भविष्यात त्याला अडचणीच्या वेळेस किंवा रिटायरमेंटनंतर आर्थिक मदत होते. आता EPFO मध्ये आणखी काही बदल करण्यात आले आहेत. कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) ने पात्र संस्थांसाठी ६ महिन्यांची विशेष माफी योजना (EPFO Amnesty Scheme 2026) सुरू केली आहे.

आता या योजनेमुळे काही विशिष्ट पीएफ ट्रस्ट चालवणाऱ्या संस्था आणि कंपन्यांना त्यांच्या नोंदी नियमित करण्याची एकदाच संधी मिळणार आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ही योजना अशा संस्थांसाठी आहे ज्यांचे पीएफ ट्रस्ट आयकर कायद्यातर्गत मान्यताप्राप्त आहेत. पण त्यांना केंद्र किंवा राज्य सरकारकडून EPF कायद्याच्या कलम १७ अंतर्गत आवश्यक असलेली औपचारिक सूट (Exemption Notification) मिळालेली नाही.

कोणत्या संस्थांना लाभ मिळणार?

विशेष माफी योजना ही अशा संस्थांसाठी लागू आहे ज्या आयकर कायदा, १९६१ अंतर्गत मान्यताप्राप्त पीएफ ट्रस्ट चालवतात, पण त्यांच्याकडे अधिकृत सूट अधिसूचना उपलब्ध नाही. या संस्थांना आता त्यांची स्थिती नियमित करण्याची संधी मिळणार आहे.

दोन गटांमध्ये विभागणी

EPFO ने पात्र संस्थांचे दोन गट केले आहेत. त्यामध्ये पहिल्या गटात अशा संस्था आहेत ज्या आधीपासूनच नियमितीकरणासाठी प्रयत्न करत आहेत आणि नियमांचं पालन सुरू केलं आहे. दुसऱ्या गटात सामाजिक सुरक्षा संहिता २०२० अंतर्गत सूट मिळालेल्या संस्था आहेत.

योजनेचा मोठा फायदा

ईपीएफओच्या या योजनेमुळे ट्रस्टच्या स्थापनेपासून ठरावीक कालावधीपर्यंतची सूट नियमित केली जाईल. तसेच काही अटींमध्ये सवलत सुद्धा देण्यात येणार आहे. यामध्ये कर्मचारी संख्या, निधीचा आकार आणि तीन वर्षांच्या पूर्वीच्या अनुपाया योजनेमुळे ट्रस्टच्या स्थापनेपासून ठरावीक कालावधीपर्यंतची सूट नियमित केली जाईल. तसेच काही अटींमध्ये सवलतही देण्यात येणार आहे. यामध्ये किमान कर्मचारी संख्या, निधीचा आकार आणि तीन वर्षांच्या पूर्वीच्या काही नियमांमधून दिलासा मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उद्योगांच्या स्थलांतराच्या इशाऱ्यानंतर एकनाथ शिंदेंची रॅपिड अ‍ॅक्शन! आधुनिक पद्धतीने चाकणचे खड्डे बुजवायला सुरूवात

Maharashtra News Live Update: चाकणमध्ये एकनाथ शिंदेंची अधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू

Doctor Attack: डॉक्टर रुग्णाला समजावत होते, मुलगा संतापला; केबिनमध्ये घुसून डॉक्टरला मारहाण

Famous Actress Death: प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्रीची प्राणज्योत मालवली; फुफ्फुसांच्या आजाराशी झुंज ठरली अपयशी

Alibaug Fort : समुद्राच्या लाटांमध्ये उभा असलेला ३०० वर्षांचा भव्य किल्ला! अलिबागला गेल्यावर 'हे' सिक्रेट ठिकाण नक्की पाहा

SCROLL FOR NEXT