Ladki Bahin Yojana : ९२ लाख लाडक्या बहिणींना झटका, योजनेतून नाव वगळलं; तुमचं नाव आहे की नाही? असं करा चेक...

Women Welfare Scheme : महाराष्ट्रातल्या लाडकी बहीण योजनेत मोठ्या पडताळणीनंतर ९२ लाख लाभार्थी वगळले गेल्या आहेत. eKYC न करणे, उत्पन्न मर्यादा आणि अपात्रता ही प्रमुख कारणे ठरली. पात्र महिलांना लाभ सुरू राहणार आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojanagoogle
Published On

महाराष्ट्रात सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते. याच संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत राज्यभर करण्यात आलेल्या पडताळणीनंतर मोठ्या प्रमाणावर लाभार्थ्यांची नावं वगळण्यात आली आहेत. सरकारी माहितीनुसार, सुमारे ९२ लाख लाभार्थी योजनेतून कमी करण्यात आलं असून, पडताळणीआधी लाभार्थ्यांची संख्या जवळपास २.२३ कोटी होती. आता या योजनेत १.५ कोटींपेक्षा जास्त महिला लाभ घेत आहेत.

लाडकी बहीण योजनेचा (ladki bahin yojana) लाभ घेणाऱ्या महिलांच्या पडताळणीत सर्वात जास्त म्हणजे ६२ लाख महिलांनी अनिवार्य eKYC प्रक्रिया पूर्ण केली नव्हती. त्यामुळे त्यांची नावं वगळ्यात आली. तसेच वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त असलेल्या १६ लाख कुटुंबातल्या महिलासुद्धा अपात्र ठरल्या. तसेच सरकारी कर्मचारी, इतर शासकीय योजनांचा लाभ घेणारे, एका कुटुंबातल्या दोनपेक्षा जास्त लाभार्थी, वयोमर्यादा ओलांडलेले लाभार्थी आणि काही पुरुष लाभार्थीही पडताळणीत आढळून आलं.

Ladki Bahin Yojana
Heart : तरुणांचा अचानक मृत्यू का होतोय? डॉक्टरांनी शोधून काढलं कारण; वाचा, तुमच्या बाबतीत तर असं घडत नाहीये ना?

अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार पडताळणीआधी वगळलेल्या लाभार्थ्यांना मिळून जवळपास १४ हजार कोटी रुपयांचं अनुदान देण्यात आलं होतं. लाभ बंद होण्याआधी या लाभार्थ्यांना १० महिने आर्थिक मदत मिळाल्याचं सांगितलं जात आहे.

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीआधी सुरू झालेल्या या योजनेसाठी आत्तापर्यंत ६० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहिन्याला १५०० रुपये आर्थिक मदत दिली जाते. पण सरकारी कर्मचारी, आयकरदाते आणि काही इतर शासकीय योजनांचे लाभार्थी या योजनेसाठी पात्र नाहीत.

Ladki Bahin Yojana
Sukanya Samriddhi Yojna: सुकन्या समृद्धी योजनेचा भन्नाट फॉर्म्युला! एवढीच गुंतवणूक करा आणि मिळवा ₹50 लाख

(ladki bahin yojana update today) महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलं की, eKYC प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांना बऱ्याचदा मुदतवाढ देण्यात आली होती. ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत संधी दिल्यानंतरही प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्यांचे पैसे थांबवण्यात आले. सरकारने कोणालाही विनाकारण वगळलं नाही, पात्र लाभार्थ्यांनाच योजनेचा लाभ सुरू राहील, असं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्यानुसार, पुरुष लाभार्थी आणि सरकारी कर्मचारी वगळून इतरांकडून आधी मिळालेल्या अनुदानाची वसुली केली जाणार नसल्याचंही त्यांन सांगितलं.

तुमचं नाव यादीत आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्ही महिला आणि बालविकास कार्यालयाशी संपर्क करून चेक करू शकतात. याचसोबत तुम्ही अधिकृत वेबसाइटवर तुमच्या अर्जाची स्थिती तपासू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com