PF Withdrawal Through UPI  saam tv
बिझनेस

EPFO UPI Withdrawal : PF चे पैसे काढण्यासाठी क्लेमची झंझट संपणार? डिसेंबरमध्ये येतेय नवी सुविधा

BHIM App : EPFO लवकरच UPI च्या मदतीने पैसे काढण्याची सुविधा सुरू करू शकते. BHIM App मधून थेट बँक खात्यात पैसे मिळण्याची शक्यता असून डिसेंबर २०२६ हे लक्ष्य आहे.

Sakshi Sunil Jadhav

प्रत्येक कामाला जाणारी व्यक्ती तिच्या पगारातला काही टक्के भाग पीएफमध्ये जमा करत असते. त्यामुळे गरजेच्या वेळेस कर्मचाऱ्यांना याचा फायदा होतो. सध्या महागाईही वाढत चालली आहे. त्यात लग्नसराईची धामधूमही पाहायला मिळत आहे. अशा कामांसाठी बरेच लोक त्यांचा पीएफ काढत असतात. आधी पीएफचे पैसे काढण्याची लांबलचक प्रोसेस फॉलो करावी लागत होती.

आता भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफ खात्यातले पैसे काढण्यासाठी आता जास्त वाट पाहावी लागणार नाही. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आपल्या सदस्यांसाठी एक नवीन सुविधा आणण्याच्या तयारीत आहे. या सुविधेमुळे कर्मचाऱ्यांना आता UPI च्या मदतीने पीएफचे पैसे थेट बँकेच्या खात्यात येतील. महत्त्वाचं म्हणजे, या सुविधेची दोन टप्प्यात चाचणी पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नोकरदारांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे.

UPI ने PF काढण्यासाठी १,००० रुपयांची मर्यादा?

UPI ने पीएफ काढताना १००० रुपयांची मर्यादा ठेवण्याचा ईपीएफओ विचार करत आहे. प्रत्येक छोट्या रकमेसाठी या सुविधेचा वापर होऊ नये आणि व्यवहारांचा जास्तीचा भार वाढू नये, हा यामागचा उद्देश असल्याचं सांगितलं जातंय.

दोन टप्प्यांतील टेस्टिंग पूर्ण

आता या नव्या सुविधेसाठी तांत्रिक तयारी सुरू आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, वेगवेगळ्या युजर ग्रुपमध्ये दोन टप्प्यातल्या टेस्टिंग पूर्ण झाली आहे. चाचणीदरम्यान काही कर्मचाऱ्यांनी UPI ने पीएफचे पैसे काढूनही पाहिले आहेत. या प्रोसेसमध्ये काही अडचणी आल्या होत्या त्या दूर करण्यात आल्यात. पण EPFO च्या नवीन सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्मवर स्थलांतर करताना काही तांत्रिक अडचणी येतायेत.

डिसेंबरमध्ये सुविधा सुरू होणार?

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर २०२६ पर्यंत UPI ने पीएफ काढण्याची प्रोसेस सुरू होण्याची शक्यता आहे. पण EPFO किंवा केंद्र सरकारकडून याबद्दल अधिकृत घोषणा झालेली नाही.

BHIM App ने मिळणार पैसे

पीएफची ही सुविधा सुरू झाली की, BHIM App ने UPI वापरून पैसे काढता येतील. ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होईल. त्यामुळे पीएफ क्लेमसाठी लागणारा वेळ कमी होऊन कर्मचाऱ्यांना पैसे मिळवणं जास्त सोपं होण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shraddha Kapoor: ईठा चित्रपटात श्रद्धा कपूरचा शाही लावणी लूक; नऊवारी साडी आणि सुंदर दागिन्यांनी खुललं सौंदर्य

1 किलो वजन कमी करण्यासाठी किती पावले चालावीत?

Maharashtra News Live Update: वरळी युनिटच्या अमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई

Delimitation Bill: मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Plastic Containers Vastu: किचनमध्ये प्लास्टिकच्या डब्यांचा खच पडलाय? वास्तूशास्त्रात सांगितलेत योग्य नियम

SCROLL FOR NEXT