employees provident fund organisation SAAM TV
बिझनेस

Employment : गुड न्यूज! EPFO कडून आकडेवारी जाहीर; जानेवारीत १६ लाखांहून अधिक सदस्य, तरूण सर्वाधिक

EPFO News : ईपीएफओने जानेवारी २०२४ मध्ये तब्बल १६.०२ लाख सदस्य जोडले आहेत.

Saam TV News

EPFO Report :

भारतासाठी गुड न्यूज आहे. संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या रिटायरमेंट फंडचे व्यवस्थापन करणाऱ्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात ईपीएफओने (EPFO) जानेवारी २०२४ मध्ये तब्बल १६.०२ लाख सदस्य (Members/Subscribers) जोडले आहेत. रविवारी जाहीर केलेल्या पेरोलच्या आकडेवारीवरून ही माहिती समोर आली आहे.

कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या निवेदनानुसार, जानेवारी २०२४ मध्ये जवळपास ८.०८ लाख सदस्य नव्याने जोडले गेले. ईपीएफओने (EPFO) जानेवारी २०२४ मध्ये निव्वळ १६.०२ लाख सदस्य जोडले आहेत. आकडेवारीनुसार, यात बहुतांश सदस्य हे १८ ते २५ वयोगटातील आहेत. ही संख्या जानेवारी २०२४ मध्ये जोडल्या गेलेल्या नवीन सदस्यांच्या ५६.४१ टक्के इतकी आहे. संघटित कामगार क्षेत्रात नव्याने सहभागी होणाऱ्या सदस्यांमध्ये सर्वात जास्त संख्या तरुणांची असल्याचे यावरून स्पष्ट होते.

१२. १७ लाख सदस्य पुन्हा EPFO चे सदस्य झाले असल्याचे पेरोलच्या आकडेवारीवरून दिसून येते. या सदस्यांनी आपली आधीची नोकरी बदलली आणि त्यानंतर पुन्हा ते EPFO चे सदस्य झाले. या कर्मचाऱ्यांनी आपला भविष्यनिर्वाह निधी ट्रान्सफर (Transfer) करण्याचा पर्याय निवडला.

आकडेवारीनुसार, जानेवारीत नव्याने जोडलेल्या ८.०८ लाख सदस्यांपैकी जवळपास दोन लाखांहून अधिक महिला आहेत. तर महिलांची एकूण संख्या साधारण ३.०३ लाख इतकी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS Officer ला सस्पेंड करण्याचा अधिकार नेमका कोणाकडे असतो? राज्य की केंद्र सरकार?

Daughter Property Rights : मुलींना वडिलांच्या मालमत्तेत हिस्सा कधी मिळत नाही? काय आहेत नियम, जाणून घ्या

Sunday Horoscope: पैशांची बरसात अन् घरात आनंद! रविवारचा 'या' ५ राशींसाठी घेऊन येणार मोठी खुशखबर

Shocking: बापरे! रेशनच्या तांदळात सापडली दातांची कवळी! धाराशिवमध्ये खळबळ

Pandharpur Corridor: कॉरिडॉरला स्थगिती देताच पंढरपूरसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, काय आहे सरकारचा नवा प्लॅन

SCROLL FOR NEXT