EPFO New Rule Saam tv
बिझनेस

EPFO 3.0: आता UPI आणि ATM मधून काढता येणार PF; लिमिट किती? वाचा सविस्तर

EPFO PF Withdrawal by UPI: ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला पीएफचे पैसे यूपीआय किंवा एटीएममधून काढता येणार आहे. यासाठी EPFO 3.0 लाँच केले जाणार आहे.

Siddhi Hande

EPFO 3.0 लवकरच होणार लाँच

यूपीआयद्वारे काढता येणार पीएफचे पैसे

पीएफचे पैसे काढण्याची लिमिट किती?

संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे पीएफ अकाउंट असते. पीएफ अकाउंटमध्ये दर महिन्याला पैसे जमा करतात. हे पैसे एक गुंतवणूक असतात. तुम्ही हे पैसे अडचणीच्या काळात काढू शकतात. हे पैसे काढण्यासाठी काही अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. दरम्यान, त्याचसोबत आता तुम्ही यूपीआय किंवा एटीएमद्वारेही पैसे काढू शकणार आहे.

ईपीएफओची पीएफ काढण्याची ऑफलाइन प्रोसेस ही खूप मोठी आणि किचकट आहे. त्यामुळे पैसे जमा होण्यास उशिर होते. दरम्यान, आता ही प्रोसेस खूप सिंपल केली आहे.

EPFO 3.0 होणार लाँच (EPFO 3.0 Launch Soon)

ईपीएफओ लवकरच EPFO 3.0 लाँच करणार आहे. याअंतर्गत पैसे काढले जाणार आहे. मिडिया रिपोर्टनुसार, पुढच्या दोन ते तीन महिन्यात यूपीआयद्वारे पीएफ क्लेम सेटलमेंट करण्याची प्रोसेस सुरु होणार आहे.

ईपीएफओ नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) सोबत मिळून ही नवीन प्रोसेस सुरु करणार आहे. याची सुरुवात भीम अॅपवर केली जाणार आहे. तुम्ही १ लाखांपर्यंत पैसे काढू शकणार आहात.

यूपीआयद्वारे काढता येणार पैसे (PF Withdrawal Through UPI)

जर तुम्हाला महत्त्वाच्या कामांसाठी पैसे काढायचे असतील तर ऑटो मोड निवडल्यावरही सर्व प्रोसेस पूर्ण होण्यासाठी तीन दिवस लागतात. मॅन्युअल प्रोसेस करण्यासाठी अजून खूप दिवस लागतात. दरम्यान, आता नवीन यूपीआय प्रोसेसमुळे खूप कमी वेळात तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.

एटीएममधून काढता येणार पैसे

यूपीआयसोबतच तुम्ही एटीएममधूनही पैसे काढू शकणार आहे. २०२६ मध्ये कर्मचाऱ्यांना स्पेशल कार्ड दिले जाणार आहे. हे कार्ड डेबिट कार्डसारखे असणार आहे. याद्वारे तुम्ही एटीएममधून पैसे काढणार आहेत. लवकरच ही प्रोसेस सुरु केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blood Pressure: सततच्या टेन्शनमुळे वाढतो BP! तुमची ही सवय लगेच बदला, डॉक्टरांनी दिलाय सल्ला

Maharashtra Live News Update: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता शासकीय अधिकारी अडचणीत

Face Yoga Poses For Natural Skin Glow: सकाळी फक्त १० मिनिटे करा ५ फेस योगा; उन्हाळ्यातही चेहऱ्यावर राहील नॅचरल ग्लो

शुभेच्छा, चिमटे आणि 'उद्धव ठाकरेसाहेब'; आमदारांच्या निरोप समारंभात नेमकं काय घडलं? VIDEO

Health Care: दुपारी जेवल्यानंतर लगेच झोप का येते? जाणून घ्या ७ महत्वाची कारणे

SCROLL FOR NEXT