EPFO Saam Tv
बिझनेस

EPFO 3.0 Update: EPFO कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! या दिवसापासून ATM आणि UPIमधून काढता येणार PFचे पैसे, तारीख आली समोर

PF Withdrawal : EPFO सदस्यांना मे 2026 पासून ATM आणि UPIच्या माध्यमातून PF पैसे काढता येणार आहेत. त्यासाठी UAN आणि KYC पूर्ण असणं गरजेचं आहे.

Sakshi Sunil Jadhav

ईपीएफओच्या कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. प्रत्येक पगारातली काही रक्कम ही कर्मचारी पीएफ खात्यामध्ये जमा करतात. त्याने भविष्यात अडचणींच्या वेळेस किंवा रिटायरमेंटच्या वेळेस तुम्हाला हे पैसे काढता येतात. मात्र याचे अपडेट्स किंवा तुम्हाला जर पीएफ काढायचा असेल तर तुम्हाला आता बॅंकेत जाण्याची गरज नाही. EPFO कर्मचाऱ्यांसाठी हीच १ आनंदाची बातमी आहे.

आता ईपीएफओ कर्मचाऱ्यांना त्यांच्या पीएफचे पैसे ATM मधून काढता येणार आहेत. याचा फायदा ८ कोटी कर्मचाऱ्यांना होणार आहे. तुम्ही UPIच्या मदतीने तुम्ही हा पीएफ काढू शकता. पण कधीपासून अशी शंका अनेकांच्या मनात होती. याबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने गेल्या वर्षी EPFO 3.0 सुरु केले आहे. याचा उद्देश हा डिजिटल सुविधा आणि प्रक्रियांचे आधुनिकीकरण करण्याचा आहे. याचे नवे नियम २०२६ पर्यंत लागू करण्यात येतील. त्याने पीएफ संबंधित कोणत्याही समस्यांना सामोरं जावं लागणार नाही. शिवाय त्याची माहितीही तुम्हाला त्यामध्ये घरबसल्या पाहता येईल. येत्या मे महिन्यात ATM आणि UPIच्या माध्यमातून तुम्हाला पैसे काढता येणार आहेत.

कोण करू शकतो या सुविधेचा वापर?

EPFO च्या ऑनलाइन सेवा, PF ट्रान्सफर, क्लेम सेटलमेंट किंवा इतर डिजिटल सुविधांचा लाभ फक्त ज्यांचा UAN अॅक्टिव्ह आहे आणि सर्व KYC माहिती अपडेट आहे त्यांनाच मिळणार आहे.

कोणती कागदपत्रे लिंक असणे आवश्यक?

आधार कार्ड

PAN कार्ड

बँक खाते क्रमांक

IFSC कोड

ही माहिती UAN शी लिंक असल्यास सदस्यांना ऑनलाइन क्लेम प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करता येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : जळगावच्या मानाच्या गणपतीचे विसर्जन; महापौरांसह जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनी केली आरती

Gold Price Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! सोनं-चांदीच्या किंमती मोठा बदल, जाणून घ्या २४ , २२ आणि १८ कॅरेटचा भाव

Palak Tikki For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी घरीच बनवा पालक टिक्की, सोपी आहे रेसिपी

LPG Gas Cylinder : ग्राहकांसाठी मोठी बातमी! वर्षाला ६ सिलिंडर मिळणार मोफत; कुठे आणि कोणासाठी लागू केला आहे हा निर्णय? वाचा

वर्षांपूर्वी रस्ता बांधताना आक्षेप घेतला नाही म्हणून भरपाई नाकारता येईल का? उच्च न्यायालयाने स्पष्टच सांगितलं...

SCROLL FOR NEXT