Easy Rangoli Designs For Diwali: रांगोळी काढण्यासाठी वेळ नाही? मग अवघ्या 5 मिनिटांत काढा सुंदर आणि सोप्या रांगोळी डिझाईन्स

5-Minute Rangoli Ideas: रांगोळी काढायला वेळ नाही? अवघ्या ५ मिनिटांत दारासमोर काढा सुंदर, सोप्या आणि झटपट होणाऱ्या रांगोळी डिझाईन्स. सोप्या ट्रिक्स सविस्तर जाणून घ्या.
Easy Rangoli Designs For Diwali
Easy Rangoli Designs For DiwaliSaam Tv
Published On: 

दिवाळी सण म्हटलं की घराची सजावट केली जाते. हिंदू संस्कृतीत, रांगोळी काढण्याला विशेष महत्व आहे. घराच्या दारासमोर किंवा उंबऱ्याजवळ रांगोळी काढणे अत्यंत शुभ मानले जाते. घराच्या दारासमोर रांगोळी काढल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि घर शोभून दिसते. आजकाल अनेकांना ऑफिसची घाई, घरची कामे यामुळे रांगोळी काढायला वेळ मिळत नाही त्यामुळे रांगोळी काढणं शक्य होत नाही. जर तुमच्याकडेही वेळ नसेल तर काळजी करू नका. अवघ्या ५ मिनिटांत काढता येतील अशा सोप्या रांगोळी डिझाईन्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Easy Rangoli Designs For Diwali
Vastu Tips For Work From Home: तुम्हीही बेडवर बसून ऑफिसचे काम करताय? आत्ताच सोडा ही सवय, करिअर आणि प्रगतीवर होईल परिणाम

कमी वेळात झटपट रांगोळी काढण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. आपल्या स्वयंपाकघरात अशा काही वस्तू असतात त्याचा वापर तुम्ही रांगोळी काढण्यासाठी करू शकता. या वस्तूंनी रांगोळी काढल्याने घराला शोभा येते. घर अत्यंत सुंदर दिसते.

Easy Rangoli Designs For Diwali
Main Entrance Vastu Tips: घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर देवाचा फोटो लावावा की नाही, जाणून घ्या 5 महत्वाचे नियम

बांगड्यांचा वापर करा

जर तुम्हाला गोल आकार काढणे कठीण जात असेल, तर हातातील बांगड्यांचा वापर करा. जमिनीवर बांगडी ठेवून तिच्याभोवती पांढऱ्या रांगोळीने वर्तुळ करा. अशा ३-४ लहान-मोठ्या बांगड्यांच्या जोड्या एकत्र करून त्यावर सुंदर डिझाईन आणि रंग भरल्यास अवघ्या ३ मिनिटांत एक आकर्षक रांगोळी तयार होईल.

ठिपक्यांची रांगोळी

उभ्या आणि आडव्या सरळ रेषेत तुम्ही ठिपक्यांची रांगोळी काढा. ठिपक्याची रांगोळी ही जुनी पद्धत आहे. अत्यंत सोपी ही रांगोळी आहे ठिपक्याची रांगोळी काढण्यासाठी उभ्या आणि आडव्या रेषेत तुम्ही ठिपक्याची रांगोळी काढून नक्षी पूर्ण करा.

Easy Rangoli Designs For Diwali
Coffee Drinking Tips Before And After Gym: जिमआधी की जिमनंतर, कॉफी कधी प्यावी? जाणून घ्या

फुलांच्या पाकळ्यांची रांगोळी

रांगोळीचे रंग वापरण्याची वेळ नसेल, तर झेंडूची पिवळी-केशरी फुले आणि गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर करा. दाराच्या एका कोपऱ्यात किंवा उंबऱ्याशी बांगडीच्या आकारात किंवा छोट्या चौकोनात या पाकळ्या भरा. मध्यभागी एक छोटा दिवा ठेवा. ही रांगोळी २ मिनिटांत तयार होते आणि दिसायलाही अतिशय सुंदर वाटते.

कोपऱ्यातील अर्धचंद्राकृती रांगोळी

दाराच्या मध्यभागी रांगोळी काढायला जागा नसेल किंवा वेळ कमी असेल, तर दाराच्या एका कोपऱ्यात अर्धचंद्र काढा. त्या चंद्राच्या रेषेवर ३ ते ४ लहान सुटसुटीत फुले किंवा पानांची नक्षी काढा. ही डिझाईन खुप सुंदर दिसते.