Post Office Scheme : १ लाख गुंतवा अन् ₹४५,००० मिळवा व्याज; पोस्टाची भन्नाट योजना आताच करा नोट

Post Office Time Deposit Scheme: पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजनेत १ लाख गुंतवणुकीवर ५ वर्षांत सुमारे ४५ हजार व्याज मिळते. सरकारी हमीसह सुरक्षित गुंतवणूक आणि चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळतो.
Post Office Scheme
Post Office Time Deposit Schemegoogle
Published On

Post Office Scheme: गुंतवणूक केल्याने भविष्यात अडचणीच्या वेळी तुम्हाला खूप फायदा होतो. अनेकांच्या हातात पैसा टिकत नाही, आणि ऐनवेळी त्यांना इतरांसमोर हात पसरावे लागतात. पण जर तुम्ही पोस्टाच्या काही चांगल्या परतावा देणाऱ्या योजनांमध्ये गुंतवणूक केलीत तर तुम्हाला खूप फायदा होईल. पुढील योजनेत तुम्हाला १ लाख रुपये जमा केल्यावर तब्बल ४५ हजारांचं व्याज मिळेल. संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी बातमी शेवटपर्यंत वाचा.

मुळात ही पोस्ट ऑफीसची टाइम डिपॉझिट योजना आहे. यात गुंतवणूक करणं सुरक्षित आहे. कारण ही योजना सरकारद्वारे सुरु करण्यात आली आहे. यात तुम्ही १,२,३ आणि ५ वर्षांसाठी खातं उघडू शकता. तुम्हाला यामध्ये १ हजारांपासून खात्यात गुंतवणूक करता येते. तेही कोणत्या मर्यादेशिवाय.

Post Office Scheme
Pahalgam Attack: वर्षभरापूर्वी पर्यटकांच्या हत्या; पहलगामची परिस्थिती सध्या कशी आहे?

तुम्ही गुंतवलेल्या पैशांवर तुम्हाला एकूण ६.९ टक्के व्याज मिळत. हा कालावधी १ वर्षांच्या मुदतीचा आहे. मग २ वर्षांच्या ठेवींवर ७ टक्के, ३ वर्षांच्या ७.१ आणि पाच वर्षांच्या ७.५ टक्के इतकं व्याज तुम्हाला मिळतं. हे व्याज दर तीन महिन्यांनी तुमच्या रक्कमेमध्ये जोडलं जातं. याचं तुम्हाला चक्रवाढ व्याज मिळतं. हे व्याज तुम्हाला वर्षाच्या शेवटी मिळतं. तुम्ही हे तुमच्या मुद्दलीमध्ये सुद्धा जमा करु शकता.

समजा तुम्ही ५ वर्षांसाठी १ लाख रुपये गुंतवलेत तर तुम्हाला ७.५ टक्के व्याजाने म्हणजेच त्रैमासिक चक्रवाढीने मॅच्युरिटी होते. त्यावेळी तुम्हाला एकूण १,४४,९९५ रुपये मिळतात. त्यामुळे या खास योजनेत नक्कीच सहभाग घ्या. याने तुम्हाला भविष्यात खूप फायदा होईल.

Post Office Scheme
Jio Cheapest Recharge: खुशखबर! Jio चा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान; वर्षभर वापरा पण किंमती फक्त एवढीच...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com