Sakshi Sunil Jadhav
उन्हाळ्यामध्ये शरीरातील उष्णतेचे प्रमाण वाढते, त्यामुळे तुम्हाला अनेक गंभीर समस्यांना सामोरं जावं लागतं.
उन्हाळ्यातील सर्वात वाढती समस्या म्हणजे, नागीण (शिंगल्स) ही आहे. यामध्ये पोटाच्या भोवती विळखा येतो.
बऱ्याचदा अनेकांना हा विळखा एक सामान्य स्कीन इनफेक्शन वाटतं. हीच मोठी चूक ठरू शकते.
नागीण ही पोटावरती, पाठीवरती, डोळ्याजवळ आणि कमरेजवळ अशा कोणत्याही भागावर येते.
सुरुवातीला नागीण येताना त्या जागी खूप वेदना होतात. खाज सुटते.
तुम्हाला काही दिवस आधी सतत डोकेदुखी जाणवते, ताप येतो, खूप थकल्यासारखं वाटतं.
बऱ्याचदा शरीराचा दाह होणे, त्वचा लालसर होणं, त्यावर बारीक दाण्यांसारखे लालसर चटचटीत पुरळ येणं अशा समस्या जाणवतात.
शेवटच्या टप्प्यांत तुम्हाला पुरळांचा पुंजका शरीराच्या कोणत्याही भागात तयार झालेला जाणवतो.
तुम्ही यावर घरगुती उपाय न करता डॉक्टरांकडे धाव घेणं आवश्यक आहे.