Sakshi Sunil Jadhav
महाराष्ट्रात सध्या कडाक्याचं ऊन पडायला सुरुवात झाली आहे. त्यात मुलांना सुट्ट्या असल्यामुळे घरात वैतागली आहेत.
तुम्ही या दिवसांमध्ये तुम्ही कुटुंबासोबत फिरायला जायचा प्लान करत असाल तर महाराष्ट्रातल्या या TOP 7 थंडगार आणि हवेशीर हिल स्टेशनला नक्कीच भेट द्या.
मुंबई-पुण्याच्या जवळ असलेलं प्रसिद्ध ठिकाण म्हणजे लोणावळा. तिथे तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत हिल स्टेशन, हिरवा गार निसर्ग, भुशी डॅम, टायगर पॉइंटसारखी ठिकाणे तुम्ही इथे पाहू शकता.
मुंबई-पुण्याच्या जवळ असलेलं आणखी एक ठिकाण म्हणजे खंडाळा. हे शांत आणि कमी गर्दीचे ठिकाण म्हणून ओळखलं जातं.
महाबळेश्वरजवळ तुम्ही स्ट्रॉबेरी गार्डन आणि आर्थर सीट पॉइंट अशी सुंदर ठिकाणे पाहू शकता.
पाच टेकड्यांवर वसलेले पंचगणी हे शांत आणि सगळ्यात प्रसिद्ध आहे. तुम्हाला इथलं थंड वातावरण नक्कीच आवडेल.
महाराष्ट्रातील एकमेव वाहनमुक्त हिल स्टेशन म्हणजे माथेरान. कामाच्या व्यापाला कंटाळला असाल तर इथे नक्कीच जा.
नाशिकजवळचे इगतपुरी हे धबधबे आणि धुक्यासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. ट्रेकिंगसाठी हे ठिकाण बेस्ट आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातली अंबोली हे महाराष्ट्रातील थंड हिल स्टेशन आहे. तिथल्या शांततेत नक्कीच तुमचं मन रमेल.