EPFO 3.0 Saam Tv
बिझनेस

EPFO 3.0: आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार पीएफचे पैसे; EPFO 3.0 लवकरच होणार लाँच

EPFO 3.0 Changes: ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता लवकरच ईपीएफओ ३.० लाँच करणार आहे. यामध्ये तुम्हाला एटीएम आणि यूपीआयद्वारे पैसे काढता येणार आहेत.

Siddhi Hande

EPFO सदस्यांसाठी महत्त्वाची बातमी

EPFO 3.0 लवकरच होणार लाँच

एटीएम आणि यूपीआयद्वारे काढता येणार PF

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजे ईपीएफओचे तब्बल ८ कोटींपेक्षा जास्त सदस्य आहेत. ईपीएफओ लवकरच EPFO 3.0 या नावाने डिजिटल प्लॅटफॉर्म सुरु करणार आहे. या नवीन सिस्टीममुळे पीएफशीसंबंधित सर्व सेवा सोपी आणि पारदर्शक पद्धतीने मिळणार आहे. ही EPFO 3.0 सेवा जून महिन्यात लाँच होणार होती. परंतु काही तांत्रिक कारणांमुळे उशिर झाला. यासाठी Infosys, Wipro आणि TCS या कंपन्या काम करत आहेत.

मिडिया रिपोर्टनुसार, सध्या या EPFO 3.0 बाबत तपासणी सुरु आहे. परंतु लवकरच ही सेवा कर्मचाऱ्यांसाठी सुरु केली जाईल, असं सांगितलं जात आहे. या आधुनिक सुविधेमुळे पीएफसंबंधित सर्व कामे सोपी होणार आहेत.

एटीएममधून काढा पीएफचे पैसे

नवीन सिस्टीमनुसार, एटीएममधून पीएफचे पैसे काढले जाणार आहे. यासाठी तुम्हाला आधार कार्ड आणि बँक खाते लिंक करावे लागेल.यानंतर तुमचा यूएएन नंबर अॅक्टिव्हेट करा. यानंतर तुम्हाला पीएफ खात्यातून पैसे काढता येणार आहे. याचसोबत तुम्ही यूपीआयद्वारेही पीएफचे पैसे काढू शकतात.

सर्वकाही ऑनलाइन होणार अपडेट

EPFO 3.0 मध्ये ऑनलाइन क्लेम आणि माहितीत जर कोणता बदल करायचा असेल तर ते डिजिटल केले आहे. यासाठी तुम्हाला मोबाईलवरुन माहिती अपडेट करता येणार आहेत. याद्वारे तुम्ही नाव, वैयक्तिक माहिती अपडेट करु शकणार आहात.

PF ची सर्व माहिती एका क्लिकवर

EPFO 3.0 एका नवीन डिझाइनमध्ये असणार आहे. यातील डॅशबोर्डवर तुम्हाला पीएफबाबत सर्व माहिती मिळणार आहे. तुमचे महिन्याला किती पैसे जमा होतात. ते व्याजदर याबाबत माहिती मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: बायकोला खांबाला बांधलं, नवऱ्याकडून लाथाबुक्क्या अन् बेल्टने अमानुष मारहाण; मुलं विनवणी करत राहिले पण...

Traffic Block: वाहतूक कोंडीनं घेतला चिमुरड्याचा जीव; मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर २५ किलोमीटर वाहनांच्या रांगा

Vote Chori: राहुल गांधींचा नवा आरोप; राजुरात 6853 मतं वाढवल्याचा आरोप

Maharashtra Politics : बाळासाहेबांशेजारी दिघेंचा फोटो; शिंदे-ठाकरे सेनेत जुंपली, VIDEO

OBC Vs Maratha: लक्ष्मण हाकेंना मारण्यासाठी 11 जणांची टीम, मराठा नेते आक्रमक

SCROLL FOR NEXT