EPFO 3.0 Saam tv
बिझनेस

EPFO News: ८ कोटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीआधी EPFO घेणार मोठा निर्णय

EPFO 3.0 Implementation Date: ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. दिवाळीआधी सरकार EPFO 3.0 लाँच करण्याच्या तयारीत आहे.

Siddhi Hande

EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

दिवाळीआधी लाँच होणार EPFO 3.0

आता एटीएम आणि यूपीआयद्वारे काढता येणार पीएफ

ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ईपीएफओ कर्मचाऱ्यांना दिवाळीआधी मोठं गिफ्ट मिळणार आहे. आता कर्मचाऱ्यांना पीएफ काढण्यासाठी कोणत्याही ऑफिसच्या फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही. तुम्ही थेट एटीएम किंवा यूपीआयद्वारे पीएफचे पैसे काढू शकणार आहात.

गेल्या अनेक दिवसांपासून EPFO 3.0 सुरु करणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान आता दिवाळीआधी ही सुविधा सुरु होणार असल्याचे सांगितले जात आहे. जून महिन्यातच ही सुविधा सुरु होणार होती. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे ही सुविधा सुरु झालेली नाही. मात्र, लवकरच याबाबत निर्णय होऊ शकतो.

श्रम व रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली १०-११ ऑक्टोबर रोजी बैठक होणार आहे. यामध्ये कदाचित निर्णय होण्याची शक्यता आहे. मिडिया रिपोर्टनुसार, दिवाळीआधी ८ कोटी ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी ही नवीन सुविधा सुरु करण्याची योजना तयार करत आहेत.

एटीएमद्वारे काढता येणार पैसे

EPFO 3.0 चे उद्दिष्ट हे आहे की, कर्मचाऱ्यांना बँकेसारखी सुविधा मिळावी. या सुविधेमार्फत एटीएम किंवा यूपीआयद्वारे पीएफचे पैसे काढू शकतात. दरम्यान, यामुळे अनेक फायदे मिळणार आहे. या EPFO 3.0 मुळे पीएफची सर्व कामे डिजिटल होणार आहेत. ज्यामुळे पैसे काढणे आणि क्लेम करणे ही कामे सोपी होणार आहे.

एका अॅपवर मिळणार सर्व माहिती

EPFO 3.0 अंतर्गत तुम्ही यूपीआयद्वारे म्हणजे गुगल पे, फोन पे आणि पेटीएम या अॅपद्वारेदेखील पैसे काढू शकतात. ही सर्व कामे तुम्ही ऑनलाइन होणार आहेत. याचसोबत तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यातील बॅलेंस, कॉन्ट्रीब्युशन किंवा व्याजदराचीदेखील माहिती मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मनसेच्या किल्लेदारांनी मुंबईच्या महापौर तावडेंवर फेकली वही, VIDEO

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! भरधाव बसची महिलेला धडक, चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का, तडकाफडकी राजीनामा देत बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT