NPS And EPF Rule Change Saam tv
बिझनेस

EPF आणि NPS च्या नियमात १० महत्त्वाचे बदल; थेट रिटायरमेंट फंडवर होणार परिणाम; वाचा अपडेट

NPS And EPF Rule Change: एनपीएस आणि ईपीएफच्या नियमात बदल झाले आहेत. यामध्ये पीएफचे पैसे काढण्यापासून ते ट्रान्सफर करण्यापर्यंत अनेक नियमांमध्ये बदल झाले आहेत.

Siddhi Hande

EPF आणि NPS चे नियम बदलले

दोन्ही योजनांमध्ये मिळते सेवानिवृत्तीनंतर दर महिन्याला पेन्शन

नियम बदलल्यानंतर पगार आणि पेन्शनमध्ये बदल

देशातील प्रत्येक कर्मचाऱ्याला सेवानिवृत्तीनंतर फंड मिळावा, यासाठी दोन योजनांमध्ये गुंतवणूक करता येते. सरकारी आणि प्रायव्हेट क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना एनपीएस आणि ईपीएफमध्ये गुंतवणूक करता येते.या दोन्ही योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला भविष्यात कोणतीही आर्थिक अडचण येणार नाही. या दोन्ही योजना केंद्र सरकारद्वारे चालवली जाते. त्यामुळे या योजनांमध्ये कोणतीही रिस्क नसते.

ईपीएफ आणि एनपीएस योजनांच्या नियमांमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत. यामुळे थेट कर्मचाऱ्यांच्या पगारावर आणि पेन्शनवर परिणाम होणार आहे. काय बदल झालेत ते जाणून घ्या.

एनपीएस विड्रॉल

एनपीएस विड्रॉलच्या नियमात महत्त्वाचे बदल झाले आहे. आता तुम्ही २० टक्के रक्कमेची अॅन्युटी खरेदी करु शकतात. तुम्हाला ८० टक्के रक्कम काढता येणार आहे. याआधी ही मर्यादा ६० टक्के होती.

पूर्ण रक्कम काढता येणार

एनपीएसमध्ये कमीत कमी गुंतवणूक करणाऱ्यांच्या नियमांमध्ये बदल झाले आहे. जर तुमच्या अकाउंटमध्ये ८ लाखांपेक्षा कमी रक्कम असेल तर पूर्ण पैसे काढू शकतात.

रिटायरमेंटचा कालावधी

जर तुम्ही एनपीएसमध्ये गुंतवणूक केली तर १५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर पैसे काढू शकतात. या योजनेत तुमही ८५ वयापर्यंत गुंतवणूक करु शकतात. ६० वर्षाआधी तुम्ही चारवेळा पैसे काढू शकतात.

एनपीएसमध्ये बदल

एनपीएसमध्ये इक्विटीच्या नियमात बदल झाले आहे. ऑक्टोबर २०२५ पासून प्रायव्हेट खातेधारक त्यांच्या जमा रक्कमेतील १०० टक्के रक्कम इक्विटीमध्ये गुंतवणूक करु शकतात. याआधी ही मर्यादा ७५ टक्के आहे.

EPFO विड्रॉल नियम

ईपीएफओ ३.० मध्ये अनेक नियम सोपे केले आहेत. याआधी तुम्ही १३ वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे काढू शकत होता. आता ३ कॅटेगरीमध्ये तुम्ही पैसे काढू शकतात. तसेच विड्रॉलचा कालावधी १२ महिने करण्यात आला आहे.

नियोक्त्याची गरजच नाही

आता ईपीएफ ट्रान्सफर किंवा काढण्यासाठी नियोक्त्याची गरजच भासणार नाही. ही सर्व प्रक्रिया एकदम सोपी झाली आहे. याआधी नियोक्त्याची परवानगी लागायची.

विड्रॉलचे नियम

आता तुम्ही ५ लाखांपर्यंतचे पैसे कोणत्याही मॅन्युअल पडताळणीची गरज नाही. तुम्ही ऑटोमॅटिक पद्धतीने पीएफ काढू शकता.याचसोबतचा वेटिंग पीरियड १२ महिन्यांचा कालावधी करण्यात आला आहे.

मिनिमम बॅलेंसचे नियम

ईपीएफओ सदस्य गुंतवणूकीच्या बॅलेंसमधील १०० टक्के रक्कम काढू शकतात. दरम्यान, व्याज आणि सेवानिवृत्तीच्या वेळी तुमची २५ टक्के रक्कम ठेवावी लागणार आहे. इतर कारणांसाठी १०० टक्के काढू शकतात.

किती वेळा काढता येणार पैसे

ईपीएफओ सदस्य शिक्षणासाठी १० वेळा पैसे काढू शकतात. लग्नासाठी पाच वेळा पैसे काढू शकतात. यासाठी तुम्हाला काही कागदपत्रे लागणार आहे. यानंतर तुमचे काम होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Love Story: मुलगा हमाली करतो म्हणून नकार,आज आहे सुखी संसार; अशी आहे बिग बॉस फेम रोशन भजनकरची फिल्मी लव्हस्टोरी

Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादववर आरोप करणं पडलं महागात; 'त्या' अभिनेत्रीवर १०० कोटींचा मानहानीचा दावा

Maharashtra Elections Result Live Update : पुण्यात भाजपचे चौथे पॅनल विजयी, सर्व महिला उमेदवार जिंकल्या

अजित पवारांना मोठा धक्का, पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे 74 उमेदवार आघाडीवर |VIDEO

Jalgaon Municipal Election Result: भाजपनंतर राष्ट्रवादीनं उघडलं विजयाचं खातं; बंडखोर उमेदवाराचा दारूण पराभव

SCROLL FOR NEXT