Womens Day: 8 मार्चलाच का साजरा केला जातो जागतिक महिला दिन

Surabhi Jayashree Jagdish

महिला दिन 8

दरवर्षी 8 मार्चला संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या हक्क, संघर्ष आणि त्यांच्या योगदानाची आठवण करून देतो. महिलांच्या समानतेसाठी झालेल्या ऐतिहासिक चळवळींमुळे ही तारीख विशेष मानली जाते.

ऐतिहासिक पार्श्वभूमी

महिला दिनाची सुरुवात महिलांच्या हक्कांसाठी झालेल्या आंदोलनांमधून झाली. कामाच्या ठिकाणी समान हक्क, वेतन आणि सन्मान मिळावा यासाठी महिलांनी आवाज उठवला. या संघर्षातून पुढे जाऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर महिला दिन साजरा होऊ लागला.

1909 मध्ये पहिला महिला दिन साजरा

महिला दिन प्रथम 1909 साली अमेरिकेत साजरा करण्यात आला. या दिवशी महिलांच्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.यानंतर हळूहळू इतर देशांमध्येही हा दिवस साजरा करण्याची परंपरा सुरू झाली.

रशियातील महिलांचा ऐतिहासिक संघर्ष

8 मार्चची तारीख रशियातील महिलांच्या मोठ्या आंदोलनाशी जोडली जाते. त्या काळात महिलांनी आपल्या हक्कांसाठी मोठ्या प्रमाणात लढा दिला. या संघर्षामुळे महिला चळवळीला आंतरराष्ट्रीय स्वरूप मिळाले.

“ब्रेड अँड पीस”

पहिल्या महायुद्धाच्या काळात 1917 मध्ये रशियन महिलांनी “ब्रेड अँड पीस” म्हणजेच अन्न आणि शांततेची मागणी करत संप पुकारला. युद्धामुळे निर्माण झालेल्या अडचणींविरोधात महिलांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. या आंदोलनामुळे संपूर्ण देशात मोठी चळवळ उभी राहिली.

सत्तेवर झालेला परिणाम

या आंदोलनाचा परिणाम इतका मोठा होता की रशियाच्या झारला सत्ता सोडावी लागली. महिलांच्या एकजुटीने इतिहासात मोठा राजकीय बदल घडवून आणला. यामुळे महिला चळवळीचे महत्त्व जगभर अधोरेखित झाले.

समाजवादी आणि कम्युनिस्ट

समाजवादी आणि कम्युनिस्ट देशांनी हा दिवस 8 मार्चलाच साजरा करण्यास सुरुवात केली. नंतर संपूर्ण जगात ग्रेगेरियन कॅलेंडर वापरले जाऊ लागल्यामुळे हीच तारीख मान्य झाली. त्यामुळे आज जगभर 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो.

Chhatrapati Shivaji Maharaj history: अफजलखानाचा वध केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापुरी सैन्यासोबत काय केलं?

येथे क्लिक करा