कर्मचारी भविष्य निर्वाह निधी यामध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याचे खाते असते. प्रत्येक कर्मचाऱ्याला सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळावी, या उद्देशातून ही योजना सुरु करण्यात आली आहे. पीएफ खात्यात तुमचे दर महिन्याला पैसे जमा जमा होता. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये तुम्ही एक प्रकारची गुंतवणूक करतात.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमधील पैसे जर तुम्हाला काढायचे असेल तर तुम्हाला कर सवलत मिळते. ही गुंतवणूक तुमच्या भविष्यासाठी फायदेशीर आहे. भविष्यात तुम्हाला नियमितपणे पेन्शन मिळते.
जर तुम्ही एखाद्या कंपनीत ६ वर्ष नोकरी केली असेल आणि ईपीएफ खात्यातून पैसे काढत असाल तर तुम्हाला टॅक्स भरावा लागतो. परंतु तुम्ही जर एखाद्या कंपनीत ५ वर्षांपेक्षा जास्त काळ नोकरी केली असेल तर तुम्हाला ईपीएफचे पैसे काढण्यासाठी कर सवलत मिळते.
ईपीएफवरील व्याजदर (Interest On EPF)
जर एखादा कर्मचारी वर्षाला २.५ लाखांपेक्षा जास्त पीएफ भरत असेल तर त्या कर्मचाऱ्याला जास्त व्याजदर मिळू शकते, अशी तरतूद करण्यात आली आहे.
कंपनीचे पीएफमधील योगदान (Employer Contribution)
पीएफमध्ये कंपनीकडून पगाराच्या १२ टक्के रक्कम जमा केली जाते. पीएफमधील ही रक्कम ७.५ लाखांपर्यंत जमा केली जाऊ शकते. या पीएफवर तुम्हाला व्याजदर मिळते.
कर्मचाऱ्याचे योगदान (Employee Contribution)
ईपीएफमध्ये कंपनी आणि कर्मचारी दोघेही पैसे जम करतात. कर्मचारीदेखील १२ टक्के पैसे जमा करतात. या पीएफवर तुम्हाला कलम 80C अंतर्गत कर सवलत मिळते.
टीडीएस (TDS)
जर एखाद्या कर्मचाऱ्याने ५ वर्षाच्या आत ५०,००० रुपयांपेक्षा जास्त पैसे काढले तर त्यावर टीडीएस कापला जातो. १० टक्के टीडीएस कापला जातो.यासाठी तुम्हाला 15G/15H फॉर्म सबमिट करावा लागतो. जर तुम्ही तो फॉर्म सबमिट केला नाही तर तुम्हाला पॅन कार्ड सबमिट करावे लागतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.