EPFO Auto Claim Saam TV
बिझनेस

EPFO Auto Claim : EPFOचा नागरिकांना मोठा दिलासा; घर, लग्न, आजारपणासाठी करता येणार ऑटो क्लेम

EPFO Auto Claim Settlement: नागरिकांना स्वत: गुंतवलेले पैसे झटपट मिळत नाहीत. नागरिकांना ईपीएफओ खात्यात पैसे गुंतवल्यानंतर ते पुन्हा परत घेताना पटकन मिळावेत यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.

Ruchika Jadhav

घर खरेदी, लग्न समारंभ किंवा आजरपण असो यासाठी आपण पीएफ खात्याकडे धाव घेतो. यातून पैसे काढण्याची प्रोसेस फार मोठी असते. त्यामुळे नागरिकांना स्वत: गुंतवलेले पैसे झटपट मिळत नाहीत. नागरिकांना ईपीएफओ खात्यात पैसे गुंतवल्यानंतर ते पुन्हा परत घेताना पटकन मिळावेत यासाठी EPFOकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

काय आहे निर्णय?

आता EPFO मंत्रालयाने कर्मचाऱ्यांच्या सुविधेयासाठी ऑटो क्लेम सेटलमेंटची व्यवस्था केली आहे. त्यामुळे घर खरेदी, लग्न, आजारपण, शिक्षण अशा कामांसाठी ऑटो क्लेम करता येणार आहे. या सर्व कामांसाठी ऑटो क्लेम केल्यानंतर लेंदी प्रोसेस टाळली जाणार आहे. पैसे तुम्हाला मिळेपर्यंत मधल्या प्रोसेसमध्ये कोणतीही व्यक्ती नसणारे. पैसे थेट तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. इतकेच नाही तर EPFO ने ऑटो क्लेम सेटलमेंटची मर्यादा 50,000 रुपयांवरून 1 लाख रुपये केली आहे.

EPFO योजनेविषयी माहिती

EPFO (Employee Provident Fund) योजना १९५२ मध्ये सुरू झाली आहे. यामध्ये नोकरी करणाऱ्या व्यक्ती पैस गुंतवतात. सुरुवातीला फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही योजना होती. मात्र आता खजगी कंपनीत २० हून अधिक कर्मचारी काम करत असल्यास त्यांना देखील याचा लाभ घेता येतो. यामध्ये आपल्या पगारातून एक रक्कम प्रोविडंट फंडात जमा केली जाते. रिटायरमेंटच्यावेळी या पैशांचा आपल्याला भरपूर फायदा होतो.

पीपीएफ (PPF) म्हणजे नेमकं काय?

अनेक व्यक्तींना ईपीएफ आणि पीपीएफमध्ये संभ्रम आहे. तर ईपीएफ हा कर्मचारी वर्गासाठी आहे. तक पीपीएफ म्हणजेच पब्लिक प्रोविडेंट फंड नोकरी न करणाऱ्या व्यक्तींसाठी आहे. कोणतेही भारतीय नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. येथे गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांना 7.1 टक्के व्याज दर मिळतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urine Infection : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Maharashtra News Live Update: OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT