Cell Broadcast Alert google
बिझनेस

Cell Broadcast Alert: घाबरू नका! तुमच्या मोबाइलवर वाजणार सायरन; वाचा काय करावे लागेल?

Mobile Siren: 2 मे रोजी मोबाईलवर सायरन वाजणार आहे. हा सायरन सरकारने एका महत्वाच्या अलर्टसाठी वाजवण्याचा निर्णय घेतला आहे. यात घाबरण्याचे काही कारण नाही.

Sakshi Sunil Jadhav

२ मे २०२६ रोजी देशभरातल्या लाखो मोबाईलवर सायरन वाजू शकतो. यामध्ये घाबरण्याचं काही कारण नाही. सरकारने हा एक सुरक्षेचा पर्याय म्हणून निर्णय घेतलेला आहे. यामध्ये सरकार नवीन मोबाईलवरच्या डिजास्टर अलर्ट सिस्टीमचे परिक्षण करणार आहे. याचा वापर एखाद्या आपात्कालीन परिस्थितीत अलर्ट देण्यासाठी होणार आहे. त्याचे हे ट्रायल असेल. त्यामुळे घाबरण्याची काहीच गरज नाही.

सरकार एक महत्वाची चाचणी करणार आहे. दूरसंचार विभाग आणि राष्ट्रीय आपदा व्यवस्थापन प्राधिकरण एकत्र येऊन 'सेल ब्रॉडकास्ट सिस्टम'ची टेस्टींग करणार आहेत. भविष्यात जर कधी भूकंप आला, वीज पडली, त्सुनामी किंवा गॅस लीकसारख्या गंभीर आपात्कालीन परिस्थितीत नागरिकांपर्यंत तात्काळ आणि अचूक माहिती पोहोचावी यासाठी ही व्यवस्था केली आहे.

२ मे रोजी हा इमरजन्सी अलर्ट फक्त त्या मोबाईलवर येईल, ज्यामध्ये काही विशिष्ट सेटिंग्स ऑन असतील. अलर्ट आल्यावर मोबाईलवर मोठा आवाज आणि मेसेज दिसेल. अशावेळी घाबरण्याची गरज नाही. तुम्ही OK बटण दाबून तो अलर्ट बंद करू शकता.

याआधी सरकारने आपत्तीच्या अनेक सूचना SMSच्या माध्यमातून पाठवल्या आहेत. पण काही वेळा नेटवर्क समस्येमुळे हे मेसेज नागरिकांपर्यंत उशीरा पोहोचत होते किंवा काहींपर्यंत ते पोहोचतच नव्हते. त्यामुळेच 'सेल ब्रॉडकास्ट' ही नवीन तंत्रज्ञान प्रणाली विकसित करण्यात आली आहे. यामुळे एकाच विशिष्ट भागातल्या सर्व मोबाईल फोनवर एकाच वेळी अलर्ट पोहोचवला जाऊ शकतो.

तुम्हाला जर हे अलर्ट बंद करायचे असतील तर पुढील सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. त्यामध्ये सर्वप्रथम मोबाईलमधल्या सेटिंग्समध्ये जा. मग सुरक्षा आणि आपत्कालीन पर्यायावर क्लिक करा. पुढे वायरलेस आपत्कालीन इशारे आणि शेवटी चाचणी हे पर्याय निवडा. याने तुम्हाला येणारे कॉल मेसेज बंद होतील.

जर मोबाईलचं नेटवर्क गेलं असेल तरीही हा अलर्ट तुम्हाला मोबाईलच्या टॉवरकडून फोनपर्यंत पोहोचू शकेल. त्यामुळे आपात्कालीन परिस्थितीत कोणतीही माहिती वेळेवर मिळणं शक्य होईल. या सिस्टीमचे नाव SACHET असे असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुण्यात पावसाचा कहर! अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना; कोणते मार्ग राहणार बंद? वाचा

Ketan Agrawal Case : केतन अग्रवाल खून प्रकरणात बीड कनेक्शन; नव्या ट्विस्टने पुण्यात खळबळ

Kolhapur Rain: कोल्हापुरात पावसाचा कहर; पाच बंधारे पाण्याखाली! प्रशासनाने घेतला मोठा निर्णय, नागरिकांना तातडीचा इशारा

Bank Holidays : जुलै महिन्यात किती दिवस बँका बंद? यादी आली समोर आली

Maharashtra News Live Update: ठाणे बेलापूर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT