बिझनेस

Wikipedia ला टक्कर देणार 'हे' नवं सॉफ्टवेअर, एलोन मस्कची घोषणा

Grokipedia: एलोन मस्कने आता विकिपीडियाला टक्कर देण्यासाठी ‘ग्रोकीपीडिया’ नावाचा एआय आधारित सॉफ्टवेअर सुरू केला आहे.

Dhanshri Shintre

  • एलोन मस्क यांनी विकिपीडियाला प्रतिस्पर्धी म्हणून ‘ग्रोकीपीडिया’ हा एआय ज्ञानकोश लाँच केला.

  • हे प्लॅटफॉर्म पूर्णपणे एआय चॅटबॉट्सद्वारे नियंत्रित असून, पब्लिक एडिटिंग मर्यादित आहे.

  • लाँचनंतर काही तासांतच वेबसाइटवर लाखो व्हिजिट्स झाल्यामुळे ती तात्पुरती क्रॅश झाली.

  • सध्या ग्रोकीपीडियावरील बहुतांश माहिती विकिपीडियावरून घेतली गेल्याचे दिसत आहे.

विकिपीडियाबद्दल(Wikipedia) प्रत्येकाने कधीनाकधी ऐकलेच असेल. जे जगातील जवळजवळ प्रत्येक विषयाची सविस्तर माहिती मोफत उपलब्ध करून देते. आता त्याला थेट स्पर्धा देण्यासाठी एलोन मस्क यांनी ‘ग्रोकीपीडिया’ नावाचा एआय-संचालित ऑनलाइन सॉफ्टवेअर सुरू केला आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती तसेच टेस्ला, स्पेसएक्स आणि एक्स या कंपन्यांचे मालक असलेले मस्क यांनी हा प्रकल्प विकिपीडियाला एक पर्याय म्हणून सादर केला असून तो पूर्णपणे एआय चॅटबॉट्सद्वारे चालवला जाईल.

विकिपीडियाच्या तुलनेत ग्रोकीपीडियामध्ये(Grokipedia) पब्लिक एडिटिंग लिमिटेड ठेवण्यात आले आहे. या नव्या प्लॅटफॉर्मचे लक्ष मस्कच्या एआय नॉलेज सिस्टमवर असेल. मस्क यांनी असा दावा केला आहे की ग्रोकीपीडिया विकिपीडियाच्या सध्याच्या स्थितीपेक्षा अधिक स्थिर आणि त्यांच्या स्वतःच्या विचारसरणीशी सुसंगत असेल.

मस्क यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत ही घोषणा केली, “Grokipedia.com” चा प्रारंभिक वर्जन 0.1 आता लाईव्ह आहे. तर वर्जन 1.0 विकिपीडियापेक्षा दहापट चांगली असेल. या घोषणेनंतर काही वेळातच लाखो लोकांनी ग्रोकीपीडियाला भेट दिली. त्यामुळे काही क्षणांसाठी वेबसाइटची URL क्रॅश झाली. लाँचच्या वेळी या प्लॅटफॉर्मवर सुमारे ८००,००० एआय-निर्मित एंट्री उपलब्ध होत्या. तर विकिपीडियावर जवळपास ७ दशलक्ष मानवी एंट्री होत्या.

ग्रोकीपीडियाच्या वेबसाइटचा बैकग्राऊंड गडद रंगात आहे आणि सर्च बारसुद्धा त्याच टोनमध्ये सेट केलेला आहे. फॉन्ट शैली ChatGPT प्रमाणे दिसते. लँडिंग पेजवर दिसणाऱ्या आकडेवारीनुसार लाँचच्या पहिल्या दिवशी ८८५,२७९ आर्टिकल पाहिले गेले, तर त्याच दिवशी विकिपीडियावर ७,०८१,७०५ आर्टिकल पाहिले गेले.

एलोन मस्क यांनी शेअर केलेल्या पोस्टवर यूजर्सनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या. काहींनी ग्रोकीपीडियातील चुकीच्या माहितीवर टीका केली, तर काहींनी या नव्या प्रकल्पाचे कौतुक केले. सध्या मात्र ग्रोकीपीडियाचे बहुतांश स्रोत विकिपीडियावर आधारित असल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणजेच यूजर्सना ग्रोकीपीडियावर दिसणारी बहुतेक माहिती विकिपीडियावरून घेतली गेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Government: गुंठेधारकांसाठी खुशखबर! आता सातबाऱ्यावर नाव लागणार; सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra Live News Update: पुण्यात संध्याकाळी सात नंतर पेट्रोल पंप राहणार बंद

Eknath Shinde News : ठाणेकरांसाठी आनंदवार्ता! सरकारकडून मुद्रांक शुल्कात मोठी सवलत, एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

Pune Petrol Pump: पुणेकरांची महत्वाची बातमी! यापुढे संध्याकाळी ७ नंतर पेट्रोल पंप राहणार बंद; नेमकं कारण काय?

Skin Cancer: त्वचेवर ही लक्षणं दिसताच डॉक्टरांकडे धाव घ्या; स्किन कॅन्सरचे संकेत असू शकतात

SCROLL FOR NEXT