Twitter URL Changed Saam TV
बिझनेस

Twitter URL Changed : ट्विटरचं अस्तित्व पूर्णत: संपलं; URL मध्ये एलन मस्क यांनी केला मोठा बदल

Elon Musk Chenged Twitter Website URL : एलन मस्क यांनी एक्स अकाउंटवर तयार होणारी URL बदलली आहे. आता येथील सर्व URLमध्ये x.com दिसणार आहे. या आधी Twitter.com असं URL मध्ये येत होतं.

Ruchika Jadhav

गेल्या वर्षीच ट्विटरमध्ये एलन मस्क यांनी मोठा बदल केला होता. ट्विटरला एक्स असं नाव देण्यात आलं. त्यानंतर आता त्यांनी यामध्ये आणखी एक मोठा बदल केला आहे. ट्विटर अकाउंटची युआरएल देखील बदलण्यात आली आहे.

एलन मस्क यांनी एक्स अकाउंटवर तयार होणारी URL बदलली आहे. आता येथील सर्व URLमध्ये x.com दिसणार आहे. या आधी Twitter.com असं URL मध्ये येत होतं. मात्र आता एक्स अकाउंटवर ट्विटरचं पूर्ण नामोनिशाण मिटलं आहे, असं म्हणायला हरकत नाही.

ट्विटरची जबाबदारी एलन मस्क यांच्यावर आल्यानंतर त्यांनी आतापर्यंत यामध्ये अनेक बदल केले आहेत.आताही त्यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत URL बद्दल माहिती देण्यात आली आहे.

आपल्या ट्विटरमध्ये एलन मस्क यांनी लिहिलं आहे की, "आम्ही कंपनीची URL बदलली आहे. मात्र या बदलामुळे तुमच्या माहितीला कोणताही धोका नाही. तुमचा डेटा आणि प्रायव्हसीमध्ये कंपनीने काहीही बदल केलेला नाही. प्रायव्हसीशी संबंधित असलेले सर्व फिचर्स आहेत तसेच आहेत. " यासह एक लिंक शेअर करत त्यावर युजर्स त्यांची प्रायव्हसी सेटींग तपासू शकतात.

साल २०२२ पासून ट्विटरमधील बदलांना सुरुवात झाली. एलन मस्क यांनी याच वर्षी ४४ अरब डॉलर देत हे अॅप खरेदी केलं. त्यानंतर त्यांनी ट्विटरचं नाव बदललं. तसेच सर्वांच्या आठवणीची निळी चिमणी असलेला लोगो बदलला. त्यानंतर सब्सकक्रिप्शनची सुरुवात केली. या सर्वात आता URL देखील बदलली आहे. आता जुन्या ट्विटर प्रमाणे फक्त आकाशी रंग लोगोला आणि साईटला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mental Health : रील्स स्क्रोल करण्याच्या सवयीमुळे मेंदूवर होणारे पाच घातक परिणाम

Maharashtra Live News Update: स्वातंत्र्यदिनी जळगाव शहरात प्रथमच मांसविक्रीवर बंदी !

Karuna Munde : धनंजय मुंडेंचे मुंबईत ३ फ्लॅट, पण मुक्काम मात्र सरकारी बंगल्यावर, करूणा मुंडे अन् अंजली दमानियांचा गंभीर आरोप

ध्वाजारोहणास छगन भुजबळांचा नकार, मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, महायुतीत नेमकं काय सुरू?

Vastu Tips: भाद्रपद महिन्यात तुळशीला अर्पण करा 'ही' खास वस्तू, होतील आर्थिक लाभ

SCROLL FOR NEXT